Skip to main content

Posts

Showing posts from January, 2021

चटकदार कोबीची भाजी | how to make gobi matar masala | Cabbage Recipe in Marathi

चटकदार कोबीची भाजी Gobi Matar  Masala  पत्ता कोबीची भाजी / Cabbage म्हटले कि काही जण नाक मुरडतात कारण काय तर तिचा वास येतो, खाण्यासाठी कडू लागते, वगैरे,वगैरे. आता या सर्व लोकांनी कोबीची भाजी आवडीने खावं असं जर वाटत असेल तर आज हा माझा लेख खास तुमच्यासाठी 😃😃. कोबी घेण्यापासून ते शिजवेपर्यंत ची कृती तुम्हाला इथे मी सांगणार आहे. आजची रेसिपी वाचून अगदी हुबेहूब हि कोबीची भाजी बनवाल तर घरातील मंडळी तुमची तारीफ तर करतीलच पण त्याबरोबर नवऱ्याच्या टिफिन मधील हि कोबीची भाजी खाऊन ऑफिस मधील मित्र देखील वा वा 👌म्हटल्याशिवाय राहणार नाही.  कोबी कसा बघून घ्यावा ? कोबी घेताना तो ताजा आणि शक्यतो हिरवा बघून घ्यावा.  पिवळा पडलेला किंवा पांढरा कोबी हा जास्त दिवसाचा असू शकतो त्याचबरोबर त्याच्यावर पाणी मारलेले असेल तर कोबी खाण्यासाठी कडवट लागतो.  कोबी घेताना हातात घेऊन बघावा, तो आकाराने छोटा असेल पण वजनाला जास्त असेल आणि त्याचबरोबर दिसायला व्हिडिओ मध्ये दाखविल्याप्रमाणे हिरवा असेल तर तो कोबी भरीव, ताजा आणि चवीला पण छान लागतो.  जास्त मोठा आतून पोकळ, पांढरा कोब...