वांग्याची भाजी / Vangyachi Bhaji वांग्याची भाजी ( Vangyachi Bhaji / Brinjal Eggplant curry ) बनवायच्या कितीतरी वेगवेगळ्या अनोख्या पद्धती आहे. अगदी स्वयंपाक शिकत असताना देखील सुरुवातीला जास्तकरून वांग्याबटाट्याची भाजी च शिकवली जाते. पण हो अनुभव नसेल तर तुम्ही कितीही व्हिडीओ बघून किंवा फक्त सांगून भाजी टेस्टी होत नसते, त्यासाठी अनुभव हा गरजेचा बरोबर ना? खोलात जाऊन सांगायचं तर वांगी घेण्यापासून ते त्याची भाजी बनेपर्यंत खूप साऱ्या घडामोडी असतात. त्या मी तुम्हाला एकेककरून सांगणारच आहे पण सगळ्यात महत्वाचं आहे ते हे कि स्वयंपाक करताना मन प्रसन्न असावं आणि जे करत आहात ते मनलावून आणि आवडीने करावं. चला तर मग आता आपण आजची हि हटके प्रचंड सुंदर अशी वांग्याची बिना कांदा टोम्याटोची वांग्याची भाजी कशी बनवायची ते बघूया . साहित्य पाववाटी खुरसनी /कारळे/Niger Seeds १/४th cup Niger Seeds पाववाटी धने ...
A Food Blog, हा एक मराठी पारंपरिक, नवीन पाककृतीचा ब्लॉग आहे. या ब्लॉगमध्ये विविध प्रकारच्या शाकाहारी, मांसाहारी, गोड, तिखट, नाश्त्याच्या पाककृती अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत.