भोगीची मिक्स भाजी
Maharashtrian Bhogi Mix Vegetable Recipe : महाराष्ट्रीयन सण वार आणि त्या दिवशी बनविले जाणारे खाद्यपदार्थ या मागे भरपूर महत्वाची कारणे आणि उद्दिष्ट दडलेले असते.
यापैकी एक वर्ष्याच्या सुरवातीलाच येणारा सण म्हणजे मकरसंक्रांत. Makarsankranti / मकरसंक्रांतीचा आदला दिवस भोगीचा असतो तर संक्रांतीचा पुढचा दिवस क्रिकांतीचा / करीचा असतो.
भोगीच्या दिवशी Maharashtra मध्ये नैवेद्यासाठी भोगीची मिक्स भाजी आणि सोबत तिळाची भाकरी बनविली जाते.
भोगीच्या भाजीला काही ठिकाणी खिंगाट देखील म्हटले जाते.
हिवाळ्यामध्ये भोगीची Mix Vegetable भाजी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येतो. या ऋतूत शेत शिवार गहू, हरबरा, जवारी, ऊस यांनी सजलेले दिसते. त्यामुळे या दिवसात शेतातून मिळणाऱ्या आणि त्याचबरोबर नैसर्गिक रित्या शरीराला उष्णता देणारे भाज्या वापरून भोगीची Mix Vegetable भाजी बनवतात.
साहित्य
१ छोटा चमचा हिंग.
१ छोटा चमचा हळद.
२ छोटे चमचे जिरं.
१ छोटा चमचा धनापावडर.
४ छोटे चमचे लालतिखट.
चवीसाठी मीठ.
३ वगळी तेल फोडणीसाठी.
कोथिंबीर.
कडीपत्ता.
१ चमच्या तीळ.
३ ते ४ पाकळ्या ठेचलेला लहसून.
१/२ वाटी ४ ते ५ तास पाण्यात भिजवलेले शेंगदाणे.
१ वाटी सोलून घेतलेले ताजे हिरवे हरबरे.
१ वाटी सोललेले ताजे कोवळे वाटाणे.
१ वाटी धुवून साळून कापलेले गाजराचे काप .
१/२ पाव निवडून धुवून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगा.
१/२ पाव कापून धुवून घेतलेल्या वांग्याच्या फोडी.
१/४ वाटी भाजलेले तीळ आणि ७ ते ८ लहसनाच्या पाकळ्या यांच वाटण.
कृती
प्रथम कढई मध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवावे.
तेल गरम झाल्यानंतर त्यात हिंग, हळद, जिरं, धनापावडेर, कडीपत्ता, आणि ठेचलेला लहसून यांची फोडणी द्यावी.
फोडणी दिल्यानंतर त्यात लालतिखट तळून घ्यावे.
आता एकेककरून वाटाणे, हरबरे, पाण्यात भिजवलेले शेंगदाणे, गाजराचे काप, घेवड्याच्या शेंगा आणि वांग्याच्या फोडी आणि चवीसाठी मीठ टाकून १ ते २ मिनिटे तेलात चॅन परतवून घ्यावे.
भाजी शिजण्यासाठी वरतून साधारण १ ग्लास पाणी टाकावे.
गॅसची फ्लेम मोठी करून चमच्याने खालीवर भाजी खालीवर करावी.
आता वरतून तीळ टाकून भाजीत मिक्स करावे.
भाजीला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून भाजीवर झाकण ठेवावे.
१० ते १५ मिनिटानंतर झाकण बाजूला करून भाजी मिक्स करावी.
वांग्याच्या फोडी शिजल्यानंतर भाजीत भाजलेले तीळ आणि लहसनाच्या पाकळ्यांची मिक्सरमधे थोडस पाणी टाकून तयार केलेली पेस्ट टाकावी.
हि पेस्ट भाजीत व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस ची फ्लेम मोठी करावी.
आता भाजीला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून २ ते ३ मिनिटे भाजीवर झाकण ठेवावे.
२ ते ३ मिनिटानंतर गॅस बंद करून भाजीवरचे झाकण न काढता भाजी बंद गॅसवर ५ मिनिटे तशीच ठेवावी. त्यामुळे भाजीला छान कलर येतो.
५ मिनिटानंतर झाकण बाजूला करून तयार भोगीची भाजी सर्विंग बाउल मध्ये सर्व्ह करावी.
Comments
Post a Comment