बटाट्याची पातळ रस्सा भाजी Maharashtrian Potato Curry
बटाट्याची भाजी / Potato Recipe सर्वाना खूप आवडते . बटाट्याची भाजी / Potato Recipe बनवायच्या अनेक पद्धती आहे जसे की Potato Chutney , Crispy Potato fry , Chillli Potato , Btatavada , Aloo Paratha , Potato Chips, Aloo Bhujiya , Eggpalnt Potato Curry इत्यादी.
मी इथे महाराष्ट्रीयन गावाकडे झटपट बटाट्याची रस्सा भाजी / Potato Curry कशी बनवतात हे सांगितले आहे. बटाटे , कांदा आणि शेंगदाण्याचा कूट वापरून बटाट्याची रस्सा भाजी खूपच चविष्ट बनते.
गावाकडे चुल्हीवर हि भाजी बनविण्यासाठी भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यावर शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले जातात . नंतर काळ्या बुडाच्या कढईमध्ये खाली सांगितल्याप्रमाणे फोडणी देऊन बटाट्याची भाजी कमी जाळावर झाकण ठेऊन शिजत ठेवली जाते. भाजलेले शेंगदाणे पाट्यावर वाटून घेतात. शेंगदाणे वाटून होईपर्यंत भाजी मस्त शिजली जाते. भाजी शिजल्यानंतर त्यात वाटलेले शेंगदाणे टाकून चमच्याने भाजी मिक्स करून १ ते २ मिनिटानंतर चूल विझवली जाते.
साहित्य
२ मोठे चमचे
१ चमचा ठेचलेला लहसून
बारीक चिरलेली कोथिंबीर
७ ते ८ कडीपत्त्याची पाने
१ चमचा लालतिखट
१ छोटा चमचा जिरं
१ छोटा चमचा धनापावडर
१ छोटा चमचा हळद
१/२ छोटा चमचा हिंग
१/२ वाटी बारीक चिरलेला कांदा
२५० ग्रॅम बटाटे (बटाट्याचे वरचे साल काढून त्याच्या मध्यम आकारात फोडी करून पाण्यात टाकाव्यात )
१/२ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
चवीसाठी मीठ
कृती
फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकावे.
तेल तापल्यावर त्यात हिंग, हळद, जिरं, कडीपत्ता आणि ठेचलेल्या लहसनाची फोडणी द्यावी.
बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
यानंतर बारीक चिरलेला कांदा टाका.
कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा.
कांदा छान सोनेरी झाल्यानंतर धनापावडर टाकावी.
सर्व जिन्नस चमच्याने व्यवस्थित मिक्स करावे.
आता वरून लालतिखट टाकावे.
सर्व मसाला व्यवस्थित परतवल्यानंतर वरून बटाट्याच्या धुतलेल्या फोडी टाकाव्यात.
चवीसाठी मीठ टाकावे.
बटाट्याच्या फोडी मसाल्यात २ ते ३ मिनिटे परतून घेणे. त्यामुळे बटाट्याच्या भाजीला ( Potato Curry Recipe )खूप छान चव येते.
भाजी शिजण्यासाठी २ ग्लास पाणी टाकावे.
गॅसची फ्लेम मोठी करून भाजीला उकळी येऊन द्यावी.
भाजीला उकळी आल्यानंतर गॅस कमी करून कढईवर झाकण ठेवावे.
४ ते ५ मिनिटानंतर झाकण बाजूला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट भाजीत टाकूया .
बटाट्याच्या फोडी एकसारख्या शिजण्यासाठी चमच्याने त्या खालीवर कराव्यात.
३ ते ४ मिनिटे झाकण न ठेवता भाजी मंद आचेवर शिजत ठेवा.
३ ते ४ मिनिटानंतर बटाट्याच्या फोडी शिजल्या आहेत का ते चेक करावे.
बटाट्याची भाजी ( Potato Curry )शिजल्यानंतर गॅस बंद करून तयार टेस्टी बटाट्याची रस्सा भाजी / Potato Curry सर्विंग प्लेट मध्ये सर्व करावी.
Also Watch,
Kadi Pakora Recipe With english subtitle
Eggplant Potato Curry
Gajar Halva
Mix Kaddhanyachi Usal / Mix Lentil Curry with English subtitle
Vadapav Recipe
टीप
बटाट्याचा फोडी कापल्यानंतर लगेचच त्या पाण्यात टाकाव्यात त्यामुळे बटाट्याच्या फोडी काळसर नाही होणार.
बटाट्याची भाजी बनवताना कडीपत्ता आणि कोथिंबीर फोडणीमध्ये टाकल्यामुळे भाजीला अप्रतिम स्वाद येतो.
भाजी शिजत आल्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट भाजीत टाकावा. त्यामुळे बटाट्याच्या फोडी शिजण्यासाठी कमी वेळ लागतो.
बटाट्याची पातळ रस्सा भाजी Maharashtrian Potato Curry Recipe In Marathi Video
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2020/05/maharashtrian-potato-curry-batata.html
https://www.chivda.org/2020/05/maharashtrian-potato-curry-batata.html
Comments
Post a Comment