वांग्याचे भरीत Baingan Bharta Recipe प्रस्तावना - वांग्याचे भरीत / baingan Bharta सर्वाचं आवडीचे महाराष्ट्रात खूपच साध्या सोप्या पद्धतीने उपलब्ध साहित्यात अतिशय झटपट हे वांग्याचे भरीत बनवले जाते. तेलाचा वापर न करता देखील आपण वांग्याचे बनवता येते. वांग्याचं भरीत बनवायच्या निरनिराळ्या पद्धती आहेत त्यातल्याच एका पद्धतीने गावाकडील पद्धतीने झटपट खूपच चविष्ट असे वांग्याचं भरीत / Vangyach Bharit आज आपण बनवणार आहोत. चंपाषष्टी च्या नैवैद्यासाठी महाराष्ट्रात घरोघरी वांग्याचं भरीत आणि बाजरीचे रोडगे / बाजरीची भाकरी बनवली जाते आणि संध्याकाळी तळी भरल्यानंतर सर्वाना वांग्याचं भरीत बाजरीचे रोडगे (बाजरीची छोटी भाकरी किंवा चानकी ) खोबर प्रसाद म्हणून दिला जातो . खूपच छान लागतो हा प्रसाद. साहित्य १) १ किलो वांगी (कोणती पण छोट्या मोठ्या आकाराची वांगी घेऊ शकता ) २)४ मध्यम आकाराचे कांदे ३) १/२ वाटी / कप कांद्याची पात (ऑपशनल आहे ) ४) १/४ वाटी / कप शेंगदाणे ५) १ चमचा ठेचलेला लहसून ६)१/२ चमचा ठेचलेले आलं ७)२ हिरवी मिरची उभी चिरलेली...
Maharashtrian Dhirde Recipe in Marathi / Learn how to make very healthy and quick breakfast pancake / पौष्टीक धिरडे (रोजच्या वापरातल्या चपाती बनवायच्या तव्यावर )
Healthy Breakfast पौष्टीक धिरडे (रोजच्या वापरातल्या चपाती बनवायच्या तव्यावर ) प्रस्तावना - महाराष्ट्रात विविध नानाप्रकारचे धिरडे / Dhirde नाश्त्यासाठी बनविले जातात. हे धिरडे बनवायला खूपच सोपे असतात, आणि महत्वाचं म्हणजे उपलब्ध साहित्यात अगदी नवशिकाउ जरी असाल ना तरी पण हे धिरडे आरामात बनवू शकतील. धिरड्याचे प्रकार १) बेसनाचे धिरडे किंवा बेसन पोळा / chickpea pancake - याला हिंदीत बेसन चिला बोलतात. हे धिरडे बनविण्यासाठी हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचा उपयोग करतात. आणि त्यात आवडीप्रमाणे साहित्य टाकून छान धिरडे बनविले जातात. २) बाजरीचे धिरडे. ३)गव्हाच्या पिठाचे धिरडे. ४)पोह्याचे धिरडे. ५)रव्याचे धिरडे. ६)मुगाचे धिरडे. ७)तांदळाच्या पिठाचे धिरडे. ८)मिक्स कडधान्याचे धिरडे. ९)भगरीचे धिरडे. ९)साबुदाणा धिरडे . इत्यादी अनेक प्रकारचे धिरडे आहेत, जे अगदी सहज सोप्या पद्धतीने झटपट बनवता येतात . आज आपण जे धिरडे पाहणार आहोत ते जरासे हटके असे आहेत पण चवीला खूपच भारी लागतात. ...