वांग्याची भाजी /Vangyachi Bhaji
वांग्याची भाजी ( Vangyachi Bhaji / Brinjal Eggplant curry ) बनवायच्या कितीतरी वेगवेगळ्या अनोख्या पद्धती आहे. अगदी स्वयंपाक शिकत असताना देखील सुरुवातीला जास्तकरून वांग्याबटाट्याची भाजी च शिकवली जाते. पण हो अनुभव नसेल तर तुम्ही कितीही व्हिडीओ बघून किंवा फक्त सांगून भाजी टेस्टी होत नसते, त्यासाठी अनुभव हा गरजेचा बरोबर ना? खोलात जाऊन सांगायचं तर वांगी घेण्यापासून ते त्याची भाजी बनेपर्यंत खूप साऱ्या घडामोडी असतात. त्या मी तुम्हाला एकेककरून सांगणारच आहे पण सगळ्यात महत्वाचं आहे ते हे कि स्वयंपाक करताना मन प्रसन्न असावं आणि जे करत आहात ते मनलावून आणि आवडीने करावं.
चला तर मग आता आपण आजची हि हटके प्रचंड सुंदर अशी वांग्याची बिना कांदा टोम्याटोची वांग्याची भाजी कशी बनवायची ते बघूया .
साहित्य
- पाववाटी खुरसनी /कारळे/Niger Seeds १/४th cup Niger Seeds
- पाववाटी धने १/४th cup coriander seeds
- पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप १/४th cup dried coconut slices
- १ कांडी लहसून ९-१० garlic cloves
- २ हिरवी मिरची २ green chillies
- छोटासा आल्याचा तुकडा small piece of ginger
- अर्धा किलो ताजी कोवळी किडकी नसलेली वांगी Half kg Brinjal/Eggplant
- ३ वघळी तेल २ tsp cooking oil
- पाव छोटा चमचा मोहरी १/४ चमचा मस्टर्ड
- अर्धा छोटा चमचा जिरं १/२ छोटा चमचा cumin
- ७ ते ८ कडीपत्त्याची पाने ७-८ कडीपत्त्याची पाने
- अर्धा छोटा चमचा हळद १/२ छोटा चमचा हळद
- १ छोटा चमचा लालतिखट, १ tsp red chilli powder
- आणि १ छोटा चमचा गरम मसाला 1 tsp garam masala
- चवीनुसार मीठ salt as per taste
खुरसनी ( Niger seeds ) भाजून घ्यावी - मिडीयम ते मोठ्या आचेवर खुरसनी १५ ते २० सेकंद भाजावी. खुर्सानी भाजताना ती तव्यावर उडायला तडतडायला लागली कि हि भाजलेली खुरसनी थंड
होण्यासाठी प्लेट मध्ये काढावी.
धने(coriander seeds ) भाजून घ्यावे - मिडीयम ते मोठ्या आचेवर धने पण तव्यावर भाजून घ्यावे.
धने सोनेरी दिसायला सुरुवात झाली कि भाजलेली धने थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यावे.
सुख्या खोबऱ्याचे काप ( dried coconut slices ) - खोबऱ्याचे काप तव्यावर भाजून घ्यावे.
मध्यम ते मोठ्या आचेवर खोबऱ्याचे काप चमच्याने खालीवर करत छान सोनेरी दिसेपर्यंत भाजावे. आता हे सोनेरी भाजलेले सुक्या खोबऱ्याचे काप थंड होण्यासाठी प्लेट मध्ये काढूया.
- आता हे तिन्ही जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करूया.
- सर्वात आधी खुरसनी बारीक करूया.
- बारीक केलेली खुरसनी प्लेटमध्ये काढूया.
- यानंतर धने बारीक करूया.
- बारीक केलेले धने प्लेटमध्ये काढूया.
- आता बारीक करूया भाजलेले सुक्या खोबऱ्याचे काप. बारीक केलेले खोबर पण प्लेटमध्ये काढूया.
- हे तिन्ही जिन्नस वेगवेगळे बारीक करायचे आहेत. एकाचवेळी एकत्र व्यवस्थित बारीक होत नाही.
- यानंतर मिक्सरमध्ये बारीक करूया आलं लहसून हिरवी मिरची. हा बारीक केलेला लहसून आलं हिरवी मिरचीचा ठेचा प्लेटमध्ये काढावा.
- आता वांगी स्वच्छ धुवून विळीने हव्या त्या साईझमध्ये फोडी करून त्या मिठाच्या पाण्यात टाकाव्या. यामुळे बाकी वांगी चिरेपर्यंत त्यातील बी काळे पडणार नाही.
- सर्व वांगी चिरून झाल्यानंतर मोठ्या आचेवर कढई मध्ये ३ वघळी तेल टाकावे.
- तेल तापताच फोडणीसाठी तेलात टाकावी, पाव छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरं, आणि ७ ते ८ कडीपत्त्याची पाने, अर्धा छोटा चमचा हळद आणि आलं लहसून हिरवी मिरचीचा ठेचा.
- चमच्याने सर्व साहित्य तेलात २५ ते ३० सेकंद छान परतवावे.
- गॅस ची फ्लेम कमी करावी.
- कढईमधे १ छोटा चमचा लालतिखट, आणि १ छोटा चमचा गरम मसाला टाकावा. पून्हा चमच्याने व्यवस्थित मिक्स करावे.
- यानंतर बारीक केलेली खुरसनी, धने, खोबर टाकावे .
- चमच्याने मिक्स करावे.
- सुपर असा मसाला तयार झालेला आहे.
- पाण्यात टाकलेल्या वांग्याच्या फोडी धुवून मसाल्यात टाकाव्या, चमच्याने वांग्याच्या फोडी मसाल्यात व्यवस्थित मिक्स कराव्या.
- चवीनुसार मीठ टाकावे. मिक्स करावे.
- भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार कढई मध्ये पाणी ओतावे आणि मिक्स करावे.
- भाजी शिजण्यासाठी १५ ते २५ मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवावे
- १५ ते २० मिनिटात वांग्याच्या फोडी छान मऊ शिजतात.
- २० मिनिटानंतर झाकण बाजूला करावे.
- १५ ते २० मिनिटात वांग्याच्या फोडी मस्त मऊ शिजलेल्या आहेत.
गॅस बंद करून भाजीची तर्ही वर येण्यासाठी भाजी थोड्यावेळ झाकून ठेवावी. यामुळे भाजी छान सेट होते त्याचबरोबर आणखी दाटसर देखील होते.
टीप
- वांगी घेताना हिरव्या देठाची छान ताजी निरोगी कोवळी वांगी घ्यावी.
- वांगी चिरल्यानंतर त्या फोडी मिठाच्या पाण्यात टाकाव्यात त्यामुळे वांग्यातील बी काळे पडत नाही.
- भाजी चमचमीत आणि दाटसर दिसण्यासाठी ती शिजल्यानंतर लगेच सर्व्ह न करता ती १५ मिनिटे तरी गॅस बंद करून भाजीवर झाकण ठेवावे.
- भाजी कमी गॅसवर न शिजवता मध्यम आचेवर शिजवावी. यामुळे वांग्याच्या फोडी न वाफाळता चॅन मऊ शिजतात.
- वांगी चिरल्यानंतर त्या फोडी मिठाच्या पाण्यात टाकाव्यात त्यामुळे वांग्यातील बी काळे पडत नाही.
- भाजी चमचमीत आणि दाटसर दिसण्यासाठी ती शिजल्यानंतर लगेच सर्व्ह न करता ती १५ मिनिटे तरी गॅस बंद करून भाजीवर झाकण ठेवावे.
- भाजी कमी गॅसवर न शिजवता मध्यम आचेवर शिजवावी. यामुळे वांग्याच्या फोडी न वाफाळता चॅन मऊ शिजतात.
Vangyachi Bhaji Recipe Video
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2024/02/vangyache-bharit-recipe-in-marathi.html
Comments
Post a Comment