महत्वाच्या टिप्ससह तेलात न विरघळणारी मऊ न होणारी भाजणीची खमंग क्रिस्पी चकली | How to make chakali bhajani in marathi
भाजणीची चकली
( Maharashtrian Chakali Recipe )
दिवाळी ची चाहूल लागताच लगबग सुरु होते दिवाळीच्या फराळाची चकली ( Chakli ) ,चिवडा (Chivda ), करंजी (Karnji ), लाडू ( Ladoo ), अनारसे (Anarase ), साठ्याची करंजी ( Satha Karnji ), शेव (Sev ), शंकरपाळे (Shankarpali ), बर्फी (Barfi ), इत्यादी अनेक फराळाचे पदार्थ दिवाळीमध्ये महाराष्ट्रामध्ये घराघरात बनविले जातात.
चकली Chakli हा पदार्थ सर्वाना खूपच आवडतो, पण कित्येकदा काय होते कि भाजणीची चकली बनवते वेळी ती तेलात विरघळते किंवा तळल्यानंतर मऊ पडते, या सर्व चुका होऊ न देता छान क्रिस्पी, खुसखुशीत, खमंग भाजणीची चकली ( Crispy Bhajani Chakli ) आज आपण या ब्लॉग मध्ये बघूया.
साहित्य
भाजणीचे पीठ बनविण्यासाठी लागणारे साहित्य chakali bhajani flour Ingredients
२ वाटी तांदूळ / 2 cup rice
पाव वाटी हरभऱ्याची डाळ / 1/4 th cup chickpeas(gram) dal / channa dal
पाव वाटी मूग डाळ / 1/4 th cup yellow moong dal
पाव वाटी उडीद डाळ / 1/4 th cup urad dal
पाव वाटी गहू / 1/4 th cup wheat grain
पाव वाटी पोहे / 1/4 th cup poha
२ चमचे धने / 2 tbsp coriander seeds
चकलीचे पीठ भिजविण्यासाठी लागणारे साहित्य Bhajani chakali dough Ingredients
२ चमचे तीळ / 2 tbsp sesame seeds
२ छोटे चमचे लाल तिखट / 2 tsp red chilli powder
चवीनुसार मीठ / salt as per taste
२ चमचे तेल / 2 tbsp oil
अंदाजे १ लिटर पाणी / ~ 1 litre water
चकली तळण्यासाठी तेल / cooking oil for frying
कृती
चकलीची भाजणी
गॅसवर कढई ठेऊन मध्यम आचेवर सर्व साहित्य खाली लागू न देता उलथनीने सतत खालीवर करत छान खमंग कलर बदलत (हलकासा ब्राऊन कलर) नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे.
सर्व साहित्य या क्रमाने एकेककरून भाजून बाजूला काढून घ्यायचे आहे, सर्वात आधी तांदूळ, गहू, हरभऱ्याची डाळ, मुगडाळ, उडीद डाळ, आणि शेवटी पोहे.
खमंग भाजलेले तांदूळ, गहू, हरभऱ्याची डाळ, मुगडाळ, उडीद डाळ, पोहे थंड झाल्यानंतर एकत्र करून घ्यावे.
यानंतर वरून २ चमचे धने टाकावे.
धने भाजणीमध्ये मध्ये व्यवस्थित मिक्स करावे.
आता हि खमंग भाजलेली भाजणी बारीक दळून आणावी.
चकलीचे पीठ भिजविणे
भाजणी दळून आणल्यानंतर पीठ मोठ्या परातीत काढून घ्यावे.
वरून २ चमचे तीळ टाकावे.
२ छोटे चमचे लालतिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
गॅसवर साधारण १ लिटर पाणी ठेवावे गरम होण्यासाठी.
या गरम पाण्यात २ चमचे तेल टाकावे.
पाण्याला उकळी येताच गॅस बंद करून उकळले पाणी थोड थोड करून पिठात ओतून पीठ चमच्याने मिक्स करावे.
पाणी गरम असतानाच ते पिठात मिक्स करायचे आहे.
चकलीची पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त सैल नाही भिजवायचे.
चकलीची पीठ भिजवतेवेळी १ ते अर्धी वाटी पाणी शिल्लक राहू शकते.
पीठ गरम असल्याने अगोदर ते चमच्याने खालीवर करत भिजवावे.
पीठ कोमट होताच हाताने व्यवस्थित मळून घ्यावे.
पीठ व्यवस्थित भिजवल्यानंतर अर्ध्या तासासाठी झुकून ठेवावे.
अर्ध्या तासानंतर झाकण बाजूला करून पुन्हा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे.
आता या भिजविलेल्या पिठाचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यावेत म्हणजे सोऱ्यात टाकताना सोपे पडते .
आता तयार २-३ बॉल चकलीच्या सोऱ्यात टाकून चकली बनवायला घ्यावी.
चकली बनवताना आतून बाहेर गोलाकार चकली बनवायची आहे.
पहिले आणि शेवटचे टोक दाबून घ्यावे.
चकली तळणे
गॅसवर कढई ठेऊन चकली पूर्ण बुडली जातील इतके तेल चकली तळण्यासाठी कढईमधे घ्यावे.
तेल कडकडीत गरम होताच एकेककरून चकली तेलात सोडावी.
एकावेळी ३ ते ४ चकली तळायला घेतली तरी चालेल.
चकलीच्या बुडबुड्या कमी होत आहे दिसताच किंवा चमच्याने चकली खालीवर करताना ती कडक झाली असेल तर गॅसची फ्लेम मध्यम करून चकली व्यवस्थित तळून घ्यावी.
चकलीचा कलर हलकासा ब्राऊन होताच ती झाऱ्याने बाहेर काढून थंड होण्यासाठी टिशूपेपर वर काढून घ्यावी.
सर्व चकली तळून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवावी.
Maharashtrian Bhajni Chakli Video
महत्वाच्या टीप
भाजणीचे पीठ भिजवताना गरम पाण्यात टाकलेल्या तेलाचे प्रमाण कमी असावे. तेलाचे प्रमाण थोडे जरी जास्त झाले तर चकली तेलात विरघळू शकते तुटू शकते, किंवा चकली मऊ पडू शकते.
भाजणीचे पीठ भिजवताना जास्त सैल किंवा जास्त घट्ट भिजवू नये.
चकली तळण्यासाठी टाकताना तेल कडकडीत गरम असावे.
चमच्याने चकली खालीवर करताना ती कडक झाली आहे असे दिसताच ती करपू नये म्हणून गॅसची फ्लेम मध्यम करून चकली तळून घ्यावी.
चकली कमी गॅसवर तळल्यास ती जास्त तेल पिते. किंवा मोठ्या फ्लेमवर तळल्यास वरून करपते आणि आतून कच्ची राहते. त्यामुळे चकली तळताना तेल हे कडकडीत गरम असायला हवे मग नंतर चकली खालीवर करून गॅसची फ्लेम मध्यम करून चकली तळून घ्यावी.
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2020/11/how-to-make-chakali-bhajani-in-marathi.html
Also Watch
Comments
Post a Comment