Karale Chutney Recipe In Marathi
Karale याला Khursani असेही म्हणतात. हिंदीमध्ये Ramtil तर इंग्रजीमध्ये Niger Seed असे म्हटले जाते. Garlic Cloves, Dry Red Chillies, Khursani / Karale, Roasted Peanuts, चवीसाठी मीठ मिक्स करून Khursani / Karale ची चटणी बनविली जाते.
कारळे / खुरसनी चे फायदे / Niger Seeds Benefits
१) जखमेवरील खाजेसाठी खुरसनीची पेस्ट उपयोगी आहे.
२) खोकला येत असल्यास खुरसनीची अंकुरे आणि लहसून मधात मिक्स करून घ्यावे.
३) खुर्सानीचें तेल : वजन वाढविण्यासाठी, जखम लवकर बरी होण्यासाठी, त्वचेवरील सुरकुत्या घालविण्यासाठी, निद्रानाश दूर करण्यासाठी, शांत झोपेसाठी, त्वचेच्या संरक्षणासाठी, दुखण्यावरील सूज कमी करून आराम मिळविण्यासाठी, हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी खुरसनी तेल खूपच उपयुक्त आहे.
Khurasanichi Chutney बनविण्यासाठी लागणारे
Khurasanichi Chutney बनविण्यासाठी लागणारे
साहित्य
- १ वाटी कारळे / खुरसनी.
- १/२ वाटी भाजलेले शेंगदाणे.
- १५-२० लहसून पाकळ्या.
- १५-२० सुक्या लाल मिरच्या. आणि
- चवीसाठी मीठ.
कृती
प्रथम गॅसवर तवा ठेवावा गरम होण्यासाठी. तवा गरम झाल्यावर मंद आचेवरती ४-५ मिनिटे Khurasani / Karale भाजून घ्यावी.
Khurasani / Karale तडतडयाला लागल्यावर ती काढून घ्यावी. आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवावी.
लहसनाच्या पाकळ्या २-३ मिनिटे भाजून घ्याव्या म्हणजे त्यातला ओलसर थोडासा कमी होईल.
आता गॅस बंद करून गरम तव्यावर वाताडलेल्या सुक्या लाल मिरच्या टाकाव्यात म्हणजे त्या कडक होतील आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतील.
Also Watch,
Bombil Masala
Also Watch,
Bombil Masala
मिक्सरच्या भांड्यात प्रथम भाजलेली Khurasani / Karale बारीक करून एका प्लेट मध्ये काढून घ्यावी.
भाजलेले शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घ्यावा. शेंगदाण्याचा कूट खुरासणीमध्ये मिक्स करून घ्यावा.
शेवटी लाल मिरच्या आणि लहसून बारीक केल्यावर त्यामध्ये khurasani / Karale आणि शेंगदाण्याचा कूट घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.
म्हणजे मिश्रण एकजीव होईल.
आता हे मिश्रण खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे khurasani / Karale आणि शेंगदाण्याच्या कुटात चमच्याने मिक्स करावे.
वरतून चवीसाठी मीठ टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
khurasanichi / कारळे ची चटणी तयार झाल्यानंतर ५-१० मिनिटानंतर ती हवाबंद डब्यात स्टोर करावी. म्हणजे चटणी भरपूर दिवस टिकेल. Khurasani / Karale Chutney प्रवासातही खाण्यासाठी घेऊन जाऊ शकतो.
जेवणाच्या वेळी थोडीशी चटणी बाजूला काढून त्यामध्ये तेल मिक्स करून जेवणाच्या ताटात तोंडी लावण्यासाठी सर्व्ह करावी.
टीप
khurasani / Karale मंद आचेवरतीच भाजावे. आणि तडतडायला लागल्यावरच काढून घ्यावे. त्यामुळे चटणीचा स्वाद खूपच छान लागतो.
मिरच्या वाताडलेल्या असतील तर गॅस बंद करून गरम तव्यावर ठेवल्यास त्या कडक होतात. आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतात.
Khurasani / Karale Chutney Recipe In Marathi Language Youtube Video ( Maharashtrian Style Recipe )
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2019/02/karale-chutney-recipe-in-marathi-niger.html
https://www.chivda.org/2019/02/karale-chutney-recipe-in-marathi-niger.html
Comments
Post a Comment