Maharashtrian Dhirde Recipe in Marathi / Learn how to make very healthy and quick breakfast pancake / पौष्टीक धिरडे (रोजच्या वापरातल्या चपाती बनवायच्या तव्यावर )
Healthy Breakfast पौष्टीक धिरडे (रोजच्या वापरातल्या चपाती बनवायच्या तव्यावर )
प्रस्तावना - महाराष्ट्रात विविध नानाप्रकारचे धिरडे / Dhirde नाश्त्यासाठी बनविले जातात. हे धिरडे बनवायला खूपच सोपे असतात, आणि महत्वाचं म्हणजे उपलब्ध साहित्यात अगदी नवशिकाउ जरी असाल ना तरी पण हे धिरडे आरामात बनवू शकतील.
धिरड्याचे प्रकार
१) बेसनाचे धिरडे किंवा बेसन पोळा / chickpea pancake - याला हिंदीत बेसन चिला बोलतात. हे धिरडे बनविण्यासाठी हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचा उपयोग करतात. आणि त्यात आवडीप्रमाणे साहित्य टाकून छान धिरडे बनविले जातात.
२) बाजरीचे धिरडे.
३)गव्हाच्या पिठाचे धिरडे.
४)पोह्याचे धिरडे.
५)रव्याचे धिरडे.
६)मुगाचे धिरडे.
७)तांदळाच्या पिठाचे धिरडे.
८)मिक्स कडधान्याचे धिरडे.
९)भगरीचे धिरडे.
९)साबुदाणा धिरडे.
इत्यादी अनेक प्रकारचे धिरडे आहेत, जे अगदी सहज सोप्या पद्धतीने झटपट बनवता येतात .
आज आपण जे धिरडे पाहणार आहोत ते जरासे हटके असे आहेत पण चवीला खूपच भारी लागतात.
यात आपण मिक्स धान्याचा वापर करणार आहोत त्यामुळे इतके पौष्टीक आणि रुचकर आहे कि घरातील लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वच आवडीने खातील. आणि बनवायला सोपे आणि झटपट होतात म्हणून तुम्ही देखील असे पीठ महिनाभरासाठी दळून आणलं हो ना ?
धिरड्याचे पीठ बनविण्यासाठी दळून आणलेले धान्य ( हे पीठ भाकरी / थालीपीठ बनविण्यासाठी देखील घेऊ शकतात ). - ५ किलो पिठासाठी २ किलो ज्वारी, २ किलो बाजरी, आणि १ किलो नागली आणि यात आवडीप्रमाणे भाजलेले ५० ग्राम जिरे, भाजलेला ओवा ५० ग्राम, भाजलेले धने ५० ग्राम दळताना टाकू शकतात.
मिक्स धान्यांचे धिरडे बनविण्यासाठी लागणारे साहित्य - ६-७ धिरडे धिरड्यांसाठी
१) दळून आणलेले पीठापैकी - १ वाटी / कप पीठ
२)१/२ वाटी/कप हरभऱ्याच्या डाळीचे पीठ
३)१/४ वाटी/कप रवा
४) १ मोठा बारीक चिरलेला कांदा
५) १ बारीक कापलेला गाजर
६) १ बारीक चिरलेला टोमॅटो
७) मूठभरून बारीक चिरलेली कोथिंबीर
८)चवीप्रमाणे मीठ
९)१ छोटा चमचा चाट मसाला (ऑपशनल आहे )
१०) १ छोटा चमचा लालतिखट
यात आणखी साहित्य आवडीप्रमाणे कमीजास्त करू शकता जसे कि तीळ टाकू शकता ठेचलेला लहसून हिरवी मिरची, इत्यादी देखील टाकू शकता. एकंदर घरातील उपलब्ध साहित्य वापरू शकतो म्हणजे फक्त कांदा आणि लालतिखट टाकून जरी हे धिरडे बनविले तरी ते खूपच चविष्ट होतात.
कृती
- सर्वात आधी एका पातेल्यात बारीक चिरलेला कांदा , बारीक कापलेला गाजर, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लालतिखट, चाट मसाला टाकून हे सर्व साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
- सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर दळून आणलेल्या मिक्स धान्यांचे पीठ,हरभऱ्याच्या डाळीचे पीठ, आणि रवा टाकून पुन्हा चमच्याने मिक्स करावे.
- आता थोडं थोडं करत पाणी टाकून धिरड्याचे पीठ तयार करूया. धिरड्याचे पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्तच पातळ असे नाही बनवायचे . धिरड्याच्या पिठाची किती पातळ आहे हे खाली दिलेल्या व्हिडीओ मध्ये पाहू शकता. धिरड्याचे पीठ भिजवल्यानानंतर चमच्याने ते व्यवस्थित तव्यावर गोलाकार पसरवता येईल इतके पीठ पातळ असावे.
- साधारण दीड ग्लास पाणी पीठ भिजवण्यासाठी लागू शकते.
-आता गॅसवर गरम होण्यासाठी तवा ठेवावा .
- तवा चांगला तापल्यावर गॅसची फ्लेम कमी करून तव्यावर गोलाकार तेल पसरवावे. आणि भाजीच्या मिक्स करण्याच्या चमच्याने २ चमचे धिरड्याचे पीठ तव्यावर टाकून मस्त गोलाकार आकारात पसरवावे .
-भिजवलेले पीठ गोलाकार पसरवल्यानंतर धिरड्याच्या कडेने चमच्याने तेल गोलाकार तेल सोडावे जेणेकरून धिरडे तव्याला चिटकणार नाही.
-आता गॅसची फ्लेम मध्यम करून तव्यावर झाकण ठेवावे.
-२-३ मिनिटानंतर झाकण बाजूला करून धिरड्याची खालची भाजी वर करून धिरडे दोन्ही बाजूनी मस्त खरपूस सोनेरी असे भाजून घ्यावे.
-धिरड्याच्या दोन्ही भाजू छान खरपूस खमंग सोनेरी होताच तयार धिरडे सर्विंग प्लेट मध्ये काढून बाकी उरलेले धिरडे आधीच्या बनवलेल्या धिरड्याप्रमाणे तयार करावे.
-तयार पिठाचे अंदाजे ६-७ छोट्या प्लेट च्या आकाराइतके धिरडे तयार होतात.
-हे तयार धिरडे टोमॅटो सॉस, चटणी, लोणचं , दह्यासोबत खाऊ शकता.
टीप
-धिरडे बनवायच्या अगोदर तवा चांगला कडकडीत तापलेला असावा.
-धिरडे तव्यावर पसरवण्याच्या अगोदर तव्याला गोलाकार तेल पसरवून घ्यावे, आणि धिरडे गोलाकार तव्यावर पसरवल्यानंतर पण धिरड्याच्या कडेने तेल टाकावे जेणेकरून धिरडे तव्याला चिटकणार नाही .
-धिरडं वरून क्रिस्पी होण्यासाठी थोडासा रवा टाकावा आणि छान खमंगासाठी थोडस हरभऱ्याच्या डाळीचे पीठ टाकावे.
मिक्स धान्याचे पौष्टिक धिरडे Recipe in Marathi YouTube Video - Millet Pancake
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2024/02/maharashtrian-dhirde-learn-how-to-make.html
Comments
Post a Comment