चटकदार कोबीची भाजी Gobi Matar Masala
पत्ता कोबीची भाजी / Cabbage म्हटले कि काही जण नाक मुरडतात कारण काय तर तिचा वास येतो, खाण्यासाठी कडू लागते, वगैरे,वगैरे. आता या सर्व लोकांनी कोबीची भाजी आवडीने खावं असं जर वाटत असेल तर आज हा माझा लेख खास तुमच्यासाठी 😃😃. कोबी घेण्यापासून ते शिजवेपर्यंत ची कृती तुम्हाला इथे मी सांगणार आहे. आजची रेसिपी वाचून अगदी हुबेहूब हि कोबीची भाजी बनवाल तर घरातील मंडळी तुमची तारीफ तर करतीलच पण त्याबरोबर नवऱ्याच्या टिफिन मधील हि कोबीची भाजी खाऊन ऑफिस मधील मित्र देखील वा वा 👌म्हटल्याशिवाय राहणार नाही.
कोबी कसा बघून घ्यावा ?
कोबी घेताना तो ताजा आणि शक्यतो हिरवा बघून घ्यावा.
पिवळा पडलेला किंवा पांढरा कोबी हा जास्त दिवसाचा असू शकतो त्याचबरोबर त्याच्यावर पाणी मारलेले असेल तर कोबी खाण्यासाठी कडवट लागतो.
कोबी घेताना हातात घेऊन बघावा, तो आकाराने छोटा असेल पण वजनाला जास्त असेल आणि त्याचबरोबर दिसायला व्हिडिओ मध्ये दाखविल्याप्रमाणे हिरवा असेल तर तो कोबी भरीव, ताजा आणि चवीला पण छान लागतो.
जास्त मोठा आतून पोकळ, पांढरा कोबी कापताना जड जात असेल तर तो शिजायला खूप वेळ लागतो त्याचबरोबर चवीला पण कडवट लागतो.
कोबी पिकाच्या दरम्यान शेतीला पाणी मुबलक मिळाले असेल तर तो कोबी चवीला खूप म्हणजे खूपच चविष्ट असतो.
साहित्य
दीड पाव कोबी / cabbage .
२ चमचे / tbsp तेल फोडणीसाठी .
७-८ कडीपत्त्याची पाने.
१ चमचा / tbsp ठेचलेला लहसून.
४-५ बारीक कापलेल्या मिरच्या.
बारीक चिरलेली कोथिंबीर.
१ छोटा चमचा / tsp हिंग. ( हिंग भाजीचा सुगंध आणि स्वाद वाढवतो त्यामुळे कोबीची सुक्की भाजी बनविताना हिंग जरूर टाकावा. ).
१ छोटा चमचा / tsp हळद.
१ छोटा चमचा / tsp धनापावडर .
१ छोटा चमचा / tsp जिरं.
१/२ वाटी ताजे ओले वाटणे.
धुवून घेतलेली मुगडाळ पाव वाटी.
१/२ वाटी बारीक फोडी केलेला टोमॅटो.
आणि चवीसाठी मीठ.
कृती
कोबीचे वरचे पान काढून टाकावे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कोबीचे भाग करून तो बारीक चिरून घ्यावा.
कोबी पिकादरम्यान त्यावरती फवारणी केलेली असू शकते त्यामुळे कोबी चिरल्यानंतर ती पाण्यात पूर्ण बुडली पाहिजे इतके पाणी टाकून गॅसच्या जास्त आचेवर उकळी यायला सुरवात होतास गॅस बंद करून चाळणीने कोबीतील पाणी बाजूला काढून टाकावे. कोबी गरम पाण्यात धुवून निघाल्यामुळे तिचा उग्र वास निघून जातो.
कढई मध्ये फोडणीसाठी तेल गरम करावे.
तेल तापताच त्यात हिंग, हळद, जिरं, कडीपत्ता, ठेचलेला लहसून आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एकामागोमाग एक छान तळून घ्यावे.
धनापावडर टाकावी.
बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीत टाकुन मस्त तळून घ्यावी .
यानंतर धुवून घेतलेली मुगाची टाकून चमच्याने मिक्स करावी .
मुगाची डाळ छान अशी क्रिस्पी दिसायला सुरवात होताच वरून बारीक कापलेल्या टोमॅटोच्या फोडी टाकाव्यात.
टोमॅटोच्या फोडी फोडणीत परतवल्यानंतर त्यामध्ये ताजा ओला वाटाणा टाकावा.
मध्यम आचेवर सर्व साहित्य १५ ते २० सेकंद तेलात छान परतून घ्यावे.
चवीसाठी मीठ टाकावे.
यानंतर कोबी टाकून चमच्याने तो व्यवस्थित मिक्स करावा.
मध्यम आचेवर कोबी शिजण्यासाठी कढईवर ५ ते ७ मिनिटे झाकण ठेवावे.
५ ते ७ मिनिटानंतर झाकण बाजूला करून कोबी चमच्याने खालीवर करावा.
कोबीवरचे झाकण बाजूला केल्यानंतर तुम्हाला कोबीचा खूपच मस्त सुगंध येईल त्याचबरोबर या शिजलेल्या कोबीचा कलर देखील मनमोहक झालेला दिसेल.
गॅस बंद करून हि तयार गरमागरम चटकदार कोबीची भाजी तुम्ही टिफिन मध्ये किंवा सर्विंग प्लेट मध्ये सर्व्ह करू शकता.
अशी हि तयार आकर्षक सुगंधित चविष्ट चटकदार कोबीची भाजी पाहिल्यानंतर ती खाऊन बघण्याचा मोह कुणालाही न आवरणार असाच असेल . त्यामुळे हि सुक्की चटकदार कोबीची भाजी तुम्ही नक्की करून बघा.
Cabbage Masala Recipe in Marathi video
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2021/01/how-to-make-gobi-matar-masala-cabbage.html
Also Watch
Comments
Post a Comment