कोथिंबिरीची वडी
Maharashtrian Kothimbir Vadi
Maharashtrian Kothimbir Vadi कोथिंबीर वडी ही महाराष्ट्राच्या पारंपारिक पदार्थापैकी एक आहे. थंडीमध्ये कोथिंबीर छान हिरवीगार ताजी महत्वाचं म्हणजे स्वस्त देखील असते. त्यामुळे थंडीमध्ये आवर्जून आपल्या घरातील अन्नपूर्णा या कोथिंबिरीपासून बनणारे पदार्थ बनवतात जसे कि कोथिंबिरीची भाकरी / Kothimbir Thalipeeth , कोथिंबिरीची वडी / Kothimbir Vadi , कोथिंबिरीची भजी, कोथिंबीरीचे मुटकुळे इत्यादी.
आपण या ब्लॉग मध्ये जी कोथिंबीर वडीची रेसिपी बघणार आहोत ती पद्धत खूपच साधी सोपी आणि कमी वेळेत होणारी रेसिपी आहे. आशा करते ही पद्धत तुम्हाला खूप आवडेल.
साहित्य
१ छोटा चमचा जिरं. / 1 tsp cumin seeds.
२-३ बारीक चिरलेली हिरवी मिरची . / 2-3 chopped green chilli.
४-५ बारीक कापलेल्या लहसनाच्या पाकळ्या. / 4-5 chopped garlic cloves.
१ इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे. / 7-8 small pieces of ginger(1 inch).
१ मोठ बाउल भरून ताजी हिरवीगार निवडून साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर. / 1 bowl fresh washed chopped Coriander leaves.
चवीनुसार मीठ. / salt as per taste.
पाव छोटा चमच्या हिंग. / 1/4 tsp asafoetida
अर्धा छोटा चमच्या हळद. / 1/2 tsp turmeric powder.
१ छोटा चमचा लालतिखट. / 1 tsp red chilli powder.
१ छोटा चमच्या धनापावडर. / 1 tsp coriander powder
१ चमचा पांढरे तीळ. / 1 tbsp sesame seeds.
२ चमचे बाजरीचे पीठ. / 2 tbsp bajara flour.
१ वाटी बेसन पीठ. / 1 cup besan/gram flour.
१ चमचा तांदळाचे पीठ. / 1 tbsp rice flour
तेल तळण्यासाठी. / oil for frying.
कृती
१ छोटा चमचा जिरं, २-३ बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, ४ ते ५ बारीक कापलेल्या लहसनाच्या पाकळ्या, आणि १ इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यावे.
आता एका मोठ्या मिक्सिंग बाउल मध्ये १ मोठं बाउल भरून ताजी हिरवीगार निवडून साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी.
या बारीक चिरलेल्या कोथिंबिरीमध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेले जिरं, लहसून, आलं, हिरव्या मिरच्या टाकाव्यात.
वरून चवीसाठी मीठ टाकावे.
पाव छोटा चमचा हिंग, १/२ छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा लालतिखट, १ छोटा चमचा धनापावडर आणि १ चमचा तीळ टाकून हे सर्व साहित्य कोथिंबिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करावे.
आता यानंतर कोथिंबिरीच्या मिश्रणामध्ये १ वाटी बेसनपीठ, २ चमचे बाजरीचे पीठ, आणि १ चमचा तांदळाचे पीठ टाकावे. थोडं थोडं पाणी टाकत मिश्रण छान मिक्स करावे.
इडली बनविण्यासाठी जितकं घट्ट बॅटर असते अगदी त्याप्रमाणे कोथिंबिरीच्या मिश्रणात थोडस पाणी टाकून इडलीप्रमाणे घट्ट मिश्रण बनवावे.
आता हे तयार कोथिंबीर वडीचे मिश्रण कूकरच्या च्या डब्यामध्ये टाकूया. त्याआधी कूकरच्या डब्याला आतून तेल लावलेले असावे.
गॅस सुरु करून मध्यम आचेवर कुकर ठेऊन त्यात साधारण अर्धा ग्लास पाणी टाकून त्यात स्टॅन्ड ठेवावा.
कोथिंबीर वडीच्या मिश्रणाचा डब्बा कूकरमधे स्टॅण्डवर ठेऊन कुकर च झाकण बंद करावे. (कूकरची शिट्टी , रिंग नाही काढलेली ).
मध्यम आचेवर कुकरची १ शिट्टी होईपर्यंत वाट बघावी.
कुकरची १ शिट्टी होताच गॅस बंद करून कुकर थंड होऊन द्यावा.
कुकर थंड झाल्यानंतर कूकरमधील कोथिंबीर वडीचा डब्बा बाहेर काढावा.
चाकूने कोथिंबीर वडीच्या बेसच्या कडा मोकळ्या करून डब्बा पालथा करत वरून हलक्या हाताने टॅप करत कोथिंबीर वडीचा बेस प्लेट मध्ये काढावा.
कोथिंबीर वडीचा बेस आतून व्यवस्थित शिजला आहे का नाही त्यासाठी टूथ पीक बेस च्या आतमध्ये घालून चेक करू शकता. टूथ पीक क्लीयर बाहेर आली तर समजावे कोथिंबिरीचा बेस मस्त शिजलेला आहे.
आता या कोथींबीरीच्या बेसच्या आपल्या आवडीप्रमाणे चाकूने वड्या तयार कराव्यात.
गॅसवर पॅन ठेऊन त्यात तेल टाकावे गरम होण्यासाठी.
कोथिंबीर वड्या तेलात व्यवस्थित तळल्या जातील इतके तेल पॅन मध्ये टाकावे.
तेल गरम होताच कोथिंबीर वड्या तेलात टाकून चमच्याने खालीवर करत हलकासा ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत तळयाच्या आहेत. कोथिंबीर वडी तळताना गॅसची फ्लेम कमी करू नये. जास्त ते मध्यम आचेवरच कोथिंबीर वडी तळयाची आहे. त्यामुळे कोथिंबीर वडी तेलकट न होता छान खुसखूशीत होते.
कोथींबीर वडीचा कलर हलकासा ब्राऊन होताच तळलेल्या गरमागरम खुसखुशीत कोथिंबीर वड्या टिशू पेपर वर काढून घ्याव्यात.
टीप
लहसून, आलं, हिरवी मिरची, आणि जिरं एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून टाकल्यामुळे कोथिंबीर वडी खूपच चविष्ट बनते. बाकी मसाल्यामुळे कोथिंबीर वडीला छान स्वाद येतो.
बाजरीच्या पिठामुळे कोथिंबीर वडीला छान खमंग येतो.
तांदळाच्या, बेसनाच्या, आणि बाजरीच्या पिठामुळे कोथिंबीर वडीला छान खमंग तर येतोच पण त्याबरोबर कोथिंबीर वडी मस्त खुसखुशीत / Crispy देखील होते.
कोथींबीर वडी तळताना गॅसची फ्लेम कमी/मंद न केल्यामुळे कोथिंबीर वडी बिलकुल तेलकट नाही होत.
Kothimbir Vadi Recipe In Marathi Video
https://www.chivda.org/2020/12/maharashtrian-kothimbir-vadi.html
Also Watch
Comments
Post a Comment