कुरकुरीत भेंडी फ्राय
Crispy Bhindi Fry Recipe in Marathi
संध्याकाळी किंवा मधल्या वेळेत चहा, कॉफी, थंड पेय इत्यादी सोबत कुरकुरीत भेंडी (Crispy Bhindi ) खाण्याचा आनंद हा निराळाच. हि कुरकुरीत भेंडी खाण्यासाठी क्रिस्पी तर असतेच पण त्याचबरोबर तिची चव देखील अप्रतिम अशी लागते, सारखी खाण्याची इच्छा होत राहणार, त्यामुळे मी खास तुमच्यासाठी हि कुरकुरीत भेंडी ची (Crispy Bhindi ) खूपच मस्त चटपटीत रेसिपी शेअर करत आहे.
साहित्य
२५० ग्राम ताजी कोवळी भेंडी.
१ छोटा चमचा तांदळाचे पीठ.
१ छोटा चमचा मैदा.
२ छोटे चमचे बेसनपीठ.
१.५ छोटा चमचा लालतिखट.
१/२ छोटा चमचा धनापावडर .
१/२ छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर.
१/४ छोटा चमचा हिंग.
१ छोटा चमचा ओवा.
थोडासा लिंबाचा रस.
आणि चवीसाठी मीठ.
कृती
सर्वात आधी भेंडी स्वच्छ धुऊन सुकवून किंवा कपड्याने कोरडी करून घ्यावी.
सुकविलेल्या भेंडीचे चाकूने किंवा विळीने वरचे टोक काढून १ भेंडीचे उभे ५ ते ६ काप करावेत.
सर्व भेंडी कापल्यानंतर त्यामध्ये वरून १ छोटा चमचा तांदळाचे पीठ, १ छोटा चमचा मैदा, २ छोटे चमचे बेसनपीठ, दिड छोटा चमचा लालतिखट, १/२ छोटा चमचा धनापावडर, १/२ छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, पाव छोटा चमचा हिंग, १ छोटा चमचा ओवा टाकून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करावे.
मीठ भेंडी तळायला घेती वेळी मिक्स करावे त्यामुळे भेंडी छान कुरकुरीत होते.
मिश्रणाला हलकासा ओलसरपणा येण्यासाठी त्याचबरोबर कुरकुरीत भेंडीला मस्त असा स्वाद येण्यासाठी वरून थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे.
लिंबाचा रस टाकल्यानंतर भेंडी हलकीशी ओलसर होते त्यामुळे हाताने मिक्स केल्यानंतर तांदळाचे पीठ, बेसनपीठ, मैदा व बाकी मसाल्यानी भेंडी व्यवस्थित कोट होते.
यानंतर गॅसवर तेल ठेवावे गरम होण्यासाठी, भेंडी नीट तळता येईल इतके तेल कढई मध्ये घ्यावे.
तेल कडकडीत गरम होताच भेंडीमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करून भेंडी तळायला घ्यावी.
भेंडी जास्त ते मध्यम आचेवरच तळावी, त्यामुळे भेंडी तेलकट न होता छान कुरकुरीत होते.
भेंडी मस्त क्रिस्पी आणि हलकासा ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यावी.
तळलेली भेंडी छान कुरकुरीत झालेली दिसताच झाऱ्याने बाहेर काढून घ्यावी .
हि तळलेली कुरकुरीत गरमागरम भेंडी चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स सोबत खाऊ शकता.
टीप
कुरकुरीत भेंडी करण्यासाठी भेंडीमधील बी जास्त कोवळे नसेल तर ते काढून टाकावे.
भेंडीला ओलसरपणा येण्यासाठी पाणी न वापरता थोडासा लिंबाचा रस टाकावा.
भेंडी तेलकट न होण्यासाठी ती जास्त ते मध्यम आचेवरच तळावी .
Crispy Bhindi Fry Recipe in Marathi Video
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2020/12/crispy-bhindi-fry-recipe-in-marathi.html
Also Watch
Comments
Post a Comment