उपवासाचे जाळीदार कुरकुरीत भगरीचे धिरडे
Upvasache Dhirde / Vrat Recipe in Marathi
प्रस्तावना
एकादशी, श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार, श्रीकृष्ण जन्माष्टमी, नवरात्री, महाशिवरात्री, गणेश चतुर्थी,नेहमीचे आठवड्याचे उपवास, इत्यादी अनेक दिवशी महाराष्ट्रात उपवास धरण्याची प्रथा किंवा वारसा हा आपल्या पुर्वज्यांकडून पारंपारिक पद्धतीने प्रत्येक कुटुंबाकडून नियमाने पाळला जातो आहे. त्यामध्ये पारंपरिक / पिढ्यानपिढ्या बनविले जाणारे उपवासाचे म्हणजेच फराळाचे पदार्थामध्ये
साबुदाणा चकली,
भगरीची चकली,
बटाट्याचे वेफर्स,
साबुदाणा पापडी,
इत्यादी कितीतरी रेसिपी आहेत ज्या आपल्या वर्षातील उपवासामध्ये आपण बनवतो त्याचबरोबर या पदार्थांची चव तर अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वाना खूपच आवडते.
आज चा हा माझा लेख खास तुमच्यासाठी अशाच एका उपवासाच्या अतिशय चविष्ट रेसिपी कशी बनवायची यावरती लिहीत आहे, आशा करते हा लेख तुम्हाला निश्चितच आवडेल.
रेसिपीचे नाव - भगरीचे जाळीदार, कुरकुरीत धिरडे. / Crispy Bhagar Dhirde.
भगरीला विविध नावाने ओळखले जाते जसे कि, Millet Barnyard, Sama ke Chawal, Varai / Bhagar, Samo / Moraiyo, Kuthirai Valli, Odalu, Kavadapullu, इत्यादी.
खूपच साधी सोपी झटपट बनणारी आणि कोणीही बनवू शकेल अशी हि रेसिपी आहे.
भगरीचे धिरडे / Bhagar Dhirde बनविण्यासाठी लागणारे साहित्य.
Ingredients
१ वाटी साफ केलेली भगर ( Varai Rice / Bhagar 1 cup ).
पाव वाटी साबुदाणा ( Sabudana / Sago 1/4 cup ).
२ बटाटे वरचे साल काढलेले ( 2 peeled potatoes ).
अर्धी वाटी कडक खमंग भाजलेले शेंगदाणे ( Roasted peanuts 1/2 cup ).
५ ते ६ कापलेल्या हिरव्या मिरच्या ( 5-6 chopped green chilli ).
कोथिंबीर ( Coriander leaves ) . - optional
चवीनुसार मीठ ( Salt as per taste ).
कृती
सर्वप्रथम १ वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाणा पातेल्यात टाकून २ ते ३ वेळा ( पाण्यात पारदर्शक दिसत नाही तोपर्यंत ) स्वच्छ धुवून घ्यायचा आहे.
भगर साबुदाणा २ ते ३ वेळा स्वच्छ धुतल्यानंतर त्यात पाणी टाकून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवावा.
यानंतर साळून घेतलेले बटाटे किसणीने किसून घ्यायचे आहे.
किसलेले बटाटे पाण्यात पारदर्शक दिसत नाही तोपर्यंत स्वच्छ धुवून घ्यावे.
अर्ध्या तासानंतर भिजलेली भगर, साबुदाणा, यामधून मिक्सरच्या भांड्यात बसेल इतके प्रमाण घेऊन त्यात भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर (ऑपशनल ), चवीप्रमाणे मीठ मिक्सरचा भांड्यात टाकून व्यवस्थित बारीक होत नाही तोपर्यंत वाटून घ्यायचे आहे.
हे सर्व साहित्य वाटताना गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकावे त्यामुळे धिरड्याच बॅटर व्यवस्थित बारीक होईल.
सर्व साहित्य बारीक वाटल्यानंतर ते किसलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करावे.
उरलेली भिजवलेली भगर आणि साबुदाणा व्यवस्थित बारीक करून किसलेल्या बटाट्यात टाकून मिक्स करून घ्यावे.
चमच्याने बॅटर एकजीव करावे.
बॅटर जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावे. बॅटर ची कन्सिस्टंसी खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये पाहू शकता.
गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवावा. तवा तापल्यानंतरच त्यावरती धिरडे तयार करायला घ्यावेत. त्याआधी तव्यावर साजूक तूप पसरवून घ्यावे त्यामुळे धिरडे तव्याला चिटकणार नाही त्याचबरोबर धिरडे छान कुरकुरीत आणि टेस्टी लागतात .
तवा तापल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून चमच्याने तयार उपवासाच्या धीरडयांचे बॅटर तव्यावर टाकावे.
खाली व्हिडीओ मध्ये दाखविल्याप्रमाणे ३ चमचे बॅटर तव्यावर टाकून चमच्याने बॅटर गोलाकार पसरवून घ्यावे.
१ ते २ मिनिटांसाठी धिरड्यावर झाकण ठेवावे.
१ ते २ मिनिटानंतर झाकण बाजूला करून उलथनीने धीरड्याची खालची बाजू वर करावी.
धिरड्याच्या खालच्या बाजूला छान जाळी आलेली दिसेल.
आपल्या आवडीप्रमाणे धिरड्याच्या बाजूने आणि वरून आणखी साजूक तूप टाकून घ्यावे.
धिरडे खाली वर करत दोन्ही बाजूने छान ( हलकासा ब्राऊन होईपर्यंत ) भाजून घ्यावे.आणि गरमगरम शेंगदाण्याच्या झिरक्यासोबत किंवा बटाटाट्याच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.
याचपद्धतीने बाकी धिरडे बनवून सर्विंग प्लेट मध्ये करावे.
टीप
आपल्या रोजच्या चपाती बनविण्याच्या अल्युमिनियमच्या तव्यावर हे भगरीचे धिरडे खूपच कुरकुरीत बनतात ( धिरडे बनविण्याअगोदर तवा घासलेला असावा ).
हे उपवासाचे भगर साबुदाणा धिरडे खूपच टेस्टी आणि क्रिस्पी होण्यासाठी धिरडे भाजताना साजूक तूप वापरावे.
किसलेला बटाटा आणि साबुदाणा यामुळे धिरडे खूप चविष्ट लागतात.
धिरडे करण्याअगोदर तवा चांगला तापलेला असावा.
Crispy Bhagar Dhirde Recipe in Marathi Youtube Video
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2021/07/vrat-recipe-in-marathi-upvasache-dhirde.html
Comments
Post a Comment