वांग्याचे भरीत Baingan Bharta Recipe
![]() |
प्रस्तावना - वांग्याचे भरीत / baingan Bharta सर्वाचं आवडीचे महाराष्ट्रात खूपच साध्या सोप्या पद्धतीने उपलब्ध साहित्यात अतिशय झटपट हे वांग्याचे भरीत बनवले जाते. तेलाचा वापर न करता देखील आपण वांग्याचे बनवता येते. वांग्याचं भरीत बनवायच्या निरनिराळ्या पद्धती आहेत त्यातल्याच एका पद्धतीने गावाकडील पद्धतीने झटपट खूपच चविष्ट असे वांग्याचं भरीत / Vangyach Bharit आज आपण बनवणार आहोत. चंपाषष्टी च्या नैवैद्यासाठी महाराष्ट्रात घरोघरी वांग्याचं भरीत आणि बाजरीचे रोडगे / बाजरीची भाकरी बनवली जाते आणि संध्याकाळी तळी भरल्यानंतर सर्वाना वांग्याचं भरीत बाजरीचे रोडगे (बाजरीची छोटी भाकरी किंवा चानकी ) खोबर प्रसाद म्हणून दिला जातो . खूपच छान लागतो हा प्रसाद.
साहित्य
१) १ किलो वांगी (कोणती पण छोट्या मोठ्या आकाराची वांगी घेऊ शकता )
२)४ मध्यम आकाराचे कांदे
३) १/२ वाटी / कप कांद्याची पात (ऑपशनल आहे )
४) १/४ वाटी / कप शेंगदाणे
५) १ चमचा ठेचलेला लहसून
६)१/२ चमचा ठेचलेले आलं
७)२ हिरवी मिरची उभी चिरलेली
८)१ चमचा कुटलेली सुकी लाल मिरची (ऑपशनल आहे लाल तिखट पावडर किंवा ठेचलेली हिरवी मिरची पण घेऊ शकता )
९) ताजी बारीक चिरलेली मूठभर कोथिंबीर
१०) तेल
११) चवीसाठी मीठ
कृती
- सर्वात आधी सर्व कांदे विळीने बारीक चिरून घ्यावे.
- खाली दिलेल्या व्हिडीओ मध्ये दाखविल्याप्रमाणे वांगी धुवून वांग्याच्या बारीक बारीक फोडी कराव्या.
- गॅस चालू करून कढईत २ चमचे / वगळी तेल टाकावे.
- तेल तापताच सर्वात आधी शेंगदाणे तळावे .
- शेंगदाण्याचा रंग बदलताच तेलात बारीक चिरलेला कांदा तळून घ्यावा.
-कांदा छान सोनेरी तळून झाल्यावर वरून बाकी साहित्य तेलात टाकावे लहसून, हिरवी मिरची, आलं,
कोथिंबीर, कांद्याची पात आणि चवीनुसार मीठ.
- सर्व साहित्य उलथणीनीने खाली वर करत व्यवस्थित मिक्स करावे.
- १ मिनिटभर सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर बारीक कुटलेली लाल मिरची किंवा लाल तिखट पावडर टाकावी.
-उलथनीने मिक्स करावे.
-सर्वात शेवटी बारीक कापलेल्या वांग्याच्या छोट्या छोट्या फोडी कढईत टाकून उलथनीने छान मिक्स करावे.
-मोठ्या आचेवर मिक्स केल्यानंतर २ ते ३ मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवावे.
- २ मिनिटानंतर झाकण बाजूला करावे.
- २ मिनिटात छान मऊ झालेल्या वांग्याच्या फोडी उलथनीने खाली वर करत त्या मॅश म्हणचे त्याचे आणखी छोटे तुकडे करावे.
- छान चुल्हीवरील चवीसाठी गॅसच्या मोठ्या आचेवर जितके जमेल तितके शिजलेली वांगी उलथनीने छान मॅश करावी.
- आता आणखी २ मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवावे.
- २ मिनिटानंतर झाकण बाजूला करून तयार अतिशय स्वादिष्ट असे वांग्याचे भरीत सर्व्ह करण्यासाठी तयार असेल.
टिप
-मार्केट/बाजारात मिळणारी वांगी आतून किडलेली असू शकतात त्यामुळे वांगी अशी बारीक कापून देखील झटपट चुल्हीवरील चवीसारखं वांग्याचं भरीत वरील कृतीप्रमाणे आणि खाली दाखवलेल्या व्हिडिओप्रमाणे बनवू शकतो.
-वांगी मॅश करताना गॅसची फ्लेम हि मोठीच असावी मोठया फ्लेम मुळे वांग्याचे भरीत गिळगिळीत पातळ होणार नाही .
-मसाल्याच्या डब्यातील मसाले न वापरता वरील कृतीप्रमाणे बनवलेले भरीत खूप चविष्ट होते.
Vangyache bharit Recipe in Marathi You Tube Video
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2024/02/vangyache-bharit-recipe-in-marathi.html
Comments
Post a Comment