आलू टिक्की / Potato Tikki Recipe In Marathi
आलू टिक्की / Potato Tikki बनवायला खूपच साधी सोपी आणि झटपट बनविली जाणारी रेसिपी आहे.
आलू टिक्की वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. चाट आलू टिक्की, उपवासाची आलू टिक्की, सुजी आलू टिक्की, पोहा आलू टिक्की, इत्यादी या टिक्की ला आपण कटलेट ,पॅटीस देखील बोलू शकतो.
वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी आलू टिक्की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानाच आवडते.
साहित्य
४ उकडलेले बटाटे
२-३ बारीक चिरलेली हिरवी मिरची
चवीसाठी मीठ
५ चमचे भगरीचे पीठ
साजूक तूप
कृती
उपवासाची आलू टिक्की साठी सर्वात प्रथम उकडलेले बटाटे किसणीने किसून घ्यावे.
चारही बटाटे किसून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची ,चवीसाठी मीठ,१ चमच्या साजूक तूप आणि ५ चमचे भगरीचे पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करावे.
सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याला छान मळून घ्यावे.
आलू टिक्की साठी लागणारा डो तयार केल्यानंतर हाताला तूप चोळून तयार डो चे छोट्या लाडवांप्रमाणे एकसारखे पेढे तयार करून घ्यावेत.
गॅसवर पॅन ठेवावा गरम होण्यासाठी .
गॅसची फ्लेम मध्यम असावी.
पॅनमध्ये १ चमच्या साजूक तूप टाकून सर्वबाजूने एकसारखे पसरून द्यावे.
आता पॅनमध्ये तयार तयार डो च्या केलेल्या पेढ्यांच्या छोट्या गोलाकार जाडसर चाणक्या करून पॅनमध्ये तुपात छान सोनेरी खरपूस तळून घ्यावेत.
छान सोनेरी खरपूस तळलेले आलू टिक्की / potato Tikki सर्विंग प्लेट मध्ये सर्व्ह करावेत.
टीप
आलू टिक्की आतून सॉफ्ट होण्यासाठी त्यात थोडेसे साजूक तूप टाकावे.
आलू टिक्की वरून छान क्रिस्पी होण्यासाठी ती साजूक तुपात shallow fry करावी.
Also Watch
Potato Tikki Recipe Video / Aloo Tikki Recipe
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2020/05/maharashtrian-potato-curry-batata.html
https://www.chivda.org/2020/05/maharashtrian-potato-curry-batata.html
Comments
Post a Comment