उपवासाचे जाळीदार कुरकुरीत भगरीचे धिरडे Upvasache Dhirde / Vrat Recipe in Marathi प्रस्तावना एकादशी, श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार, श्रीकृष्ण जन्माष्टमी, नवरात्री, महाशिवरात्री, गणेश चतुर्थी,नेहमीचे आठवड्याचे उपवास, इत्यादी अनेक दिवशी महाराष्ट्रात उपवास धरण्याची प्रथा किंवा वारसा हा आपल्या पुर्वज्यांकडून पारंपारिक पद्धतीने प्रत्येक कुटुंबाकडून नियमाने पाळला जातो आहे. त्यामध्ये पारंपरिक / पिढ्यानपिढ्या बनविले जाणारे उपवासाचे म्हणजेच फराळाचे पदार्थामध्ये साबुदाणा खिचडी , साबुदाणा - बटाटा थालीपीठ , भगरीचा भात , शेंगदाण्याचं झिरक , साबुदाणा वडा , रताळ्याची चटणी , रताळ्याचे खरपूस काप , उपवासाची टिक्की , लाल भोपळ्याची उपवासाची भाजी , साबुदाणा चकली, भगरीची चकली, बटाट्याचे वेफर्स, साबुदाणा पापडी, भगरीचे धिरडे , उपवासाची बटाट्याची चटणी , इत्यादी कितीतरी रेसिपी आहेत ज्या आपल्या वर्षातील उपवासामध्ये आपण बनवतो त्याचबरोबर या पदार्थांची चव तर अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वाना खूपच आवडते. आज चा हा माझा लेख खास तुमच्यासाठी अशाच ...
A Food Blog, हा एक मराठी पारंपरिक, नवीन पाककृतीचा ब्लॉग आहे. या ब्लॉगमध्ये विविध प्रकारच्या शाकाहारी, मांसाहारी, गोड, तिखट, नाश्त्याच्या पाककृती अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत.