वांग्याचे भरीत Baingan Bharta Recipe प्रस्तावना - वांग्याचे भरीत / baingan Bharta सर्वाचं आवडीचे महाराष्ट्रात खूपच साध्या सोप्या पद्धतीने उपलब्ध साहित्यात अतिशय झटपट हे वांग्याचे भरीत बनवले जाते. तेलाचा वापर न करता देखील आपण वांग्याचे बनवता येते. वांग्याचं भरीत बनवायच्या निरनिराळ्या पद्धती आहेत त्यातल्याच एका पद्धतीने गावाकडील पद्धतीने झटपट खूपच चविष्ट असे वांग्याचं भरीत / Vangyach Bharit आज आपण बनवणार आहोत. चंपाषष्टी च्या नैवैद्यासाठी महाराष्ट्रात घरोघरी वांग्याचं भरीत आणि बाजरीचे रोडगे / बाजरीची भाकरी बनवली जाते आणि संध्याकाळी तळी भरल्यानंतर सर्वाना वांग्याचं भरीत बाजरीचे रोडगे (बाजरीची छोटी भाकरी किंवा चानकी ) खोबर प्रसाद म्हणून दिला जातो . खूपच छान लागतो हा प्रसाद. साहित्य १) १ किलो वांगी (कोणती पण छोट्या मोठ्या आकाराची वांगी घेऊ शकता ) २)४ मध्यम आकाराचे कांदे ३) १/२ वाटी / कप कांद्याची पात (ऑपशनल आहे ) ४) १/४ वाटी / कप शेंगदाणे ५) १ चमचा ठेचलेला लहसून ६)१/२ चमचा ठेचलेले आलं ७)२ हिरवी मिरची उभी चिरलेली...
A Food Blog, हा एक मराठी पारंपरिक, नवीन पाककृतीचा ब्लॉग आहे. या ब्लॉगमध्ये विविध प्रकारच्या शाकाहारी, मांसाहारी, गोड, तिखट, नाश्त्याच्या पाककृती अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत.