Skip to main content

Badishep | Sounf | Mukhwas | Recipe In Marathi

Mukhwas


आजचा माझा हा लेख असणार आहे Mukhwas / Badishep बनविण्याची पध्दत यावरती पण त्याआधी मुखवासाबद्दल थोडीशी माहिती पाहूया. 
मुखवास यालाच बडीशेप ( Badishep ) असेही म्हणतात. 
मुखवास( Badishep ) आपण जेवणानंतर खाऊ शकतो, त्यामुळेआपल्या शरीराला भरपूर फायदे होतात . 

आयुर्वेदिक मुखवासाचे शरीराला होणारे फायदे खालीलप्रमाणे

  1. पचनक्रियेसाठी.  
  2. रक्त शुध्द होण्यासाठी.  
  3. तोंडाचा दुर्गंध घालविण्यासाठी, इत्यादी .
म्हणजेच नियमितपणे अशी आयुर्वेदिक आणि पौष्टिक Badishep खाल्याने आरोग्य हे चांगले राहते.   


साहित्य

  1. बाळंतशेप १/२ वाटी.  
  2. ओवा  १/२ वाटी.   
  3. धनदाळ  १/२ वाटी.   
  4. अळशी / जवस  १/२ वाटी.   
  5. तीळ  १/२ वाटी.   
  6. बडीशेप  १/२ वाटी.   
  7. पाणी २ टीस्पून.   
  8. काळमीठ / सैंधवमीठ १ टीस्पून.   
  9. किसलेले सुके खोबरे  १/२ वाटी. 

कृती 

तवा गॅसवर गरम होण्यासाठी ठेवावा. 

तवा गरम झाल्यावर त्यावर एक एक करून बाळंतशेप, ओवा, धनदाळ, अळशी / जवस, तीळ, बडीशेप, किसलेले सुके खोबरे हे सर्व जिन्नस भाजून  घ्यायचे आहेत. 

बडीशेप आणि बाळंतशेप वेगवेगळी हलकासा लालसर रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायची आहे.

भाजलेली बडीशेप आणि बाळांशेप एका प्लेटमध्ये काढून घ्यावी. 
यानंतर अळशी म्हणजेच जवस भाजून घ्यावी. 

अळशी भाजली कि ती तव्यावर तडतडते. आता हि भाजलेली अळशी बाळंतशेप आणि बडीशेप असलेल्या प्लेट मध्ये काढून घ्यावी. 

आता धनदाळ भाजून घ्यायची आहे. हलकासा लालसर रंग आला कि धनदाळ प्लेटमध्ये काढून घ्यावी. 

तीळ भाजून घ्यावेत. तीळ तव्यावर तडतडले कि ते प्लेटमध्ये काढून घ्यावेत. 

सर्वात शेवटी ओवा आणि किसलेले सुके खोबरे वेगवेगळे तव्यावर भाजून घ्यावेत. तांबूस रंग येईपर्यंत हे ओवा आणि किसलेले सुके खोबरे भाजून घेतल्यावर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यावेत. 

हे सर्व पदार्थ भाजून झाल्यानंतर ते एका बाऊलमध्ये एकत्र करून घ्यावेत. 
एका वाटीमध्ये २ छोटे चमचे पाणी घ्या आणि त्यामध्ये १ छोटा चमचा काळ मीठ ( सैंधव मीठ ) मिसळवल्यानंतर हे पाणी मिश्रणामध्ये टाकावे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

आता हे ओलसर मिश्रण मंद आचेवर साधारण १० ते १५ मिनिटे भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करून १५ ते २० मिनिटे तव्यावरच ठेवा. 

अशाप्रकारे तयार झालेली मुखवास ( Badishep ) थंड झाल्यावर एका बरणीमध्ये भरून ठेऊन जेवण झाल्यावर १ चमचा Badishep नियमितपणे खावी. 

टिप 


Mukhwas / Badishep साठी लागणारे सर्व पदार्थ हे मंद आचेवरतीच भाजावे. 

आणि त्याचप्रमाणे भाजून घेतलेली  Mukhwas / Badishep थंड झाल्यानंतरच बरणीमध्ये भरून ठेवावी. 


Mukhwas

 तुम्हाला हि रेसिपी  रेसिपी आवडली असेल तर  तुमच्या सोशल  मीडिया  प्लॅटफॉर्मवर  खाली दिलेली लिंक नक्की शेअर  करा. 

https://www.chivda.org/2019/02/badishep.html



     


                  







Comments

Popular posts from this blog

खुरसनी चटणी | Karale Chutney Recipe In Marathi | Niger Seeds Benefits

        Karale Chutney Recipe In Marathi  Karale याला Khursani असेही म्हणतात. हिंदीमध्ये Ramtil तर इंग्रजीमध्ये Niger Seed असे म्हटले जाते. Garlic Cloves, Dry Red Chillies, Khursani / Karale, Roasted Peanuts, चवीसाठी मीठ मिक्स करून Khursani  / Karale ची चटणी बनविली जाते.    कारळे / खुरसनी चे फायदे / Niger Seeds Benefits  १) जखमेवरील खाजेसाठी खुरसनीची पेस्ट उपयोगी आहे.  २) खोकला येत असल्यास खुरसनीची अंकुरे आणि लहसून मधात मिक्स करून घ्यावे.  ३) खुर्सानीचें तेल : वजन वाढविण्यासाठी, जखम लवकर बरी होण्यासाठी, त्वचेवरील सुरकुत्या घालविण्यासाठी, निद्रानाश दूर करण्यासाठी, शांत झोपेसाठी, त्वचेच्या संरक्षणासाठी, दुखण्यावरील सूज कमी करून आराम मिळविण्यासाठी, हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी खुरसनी तेल खूपच उपयुक्त आहे.  Khurasanichi Chutney बनविण्यासाठी लागणारे  साहित्य  १ वाटी कारळे / खुरसनी.  १/२ वाटी भाजलेले शेंगदाणे.  १५-२० लहसून पाकळ्या.  १५-२० सुक्या लाल मिरच्या. आणि  चवीसाठी मीठ.  कृती  प्रथम गॅसवर तवा ठेवावा गरम होण्यासाठी. तवा गरम झाल

Shengule Recipe In Marathi

              Kulith Shengule Recipe In Marathi कुळीथ पिठाचे Shengule / Kulith Shengole  महाराष्ट्रातील अतिशय जुनी पारंपारिक रेसिपी आहे.  Shengule / Kulith Shengole  खाण्यासाठी खूपच चविष्ट आणि पौष्टिक असतात.  थंडीमध्ये तर आवर्जून Shengule / Kulith Shengole  बनविले जातात.  Kulith Benefits : प्रोटीन, व्हिटॅमिन, लोह यांच प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते.  कुळीथ पिठाचे सूप लहान मुलांसाठी खूपच पौष्टिक असते.  साहित्य   फोडणीसाठी तेल २ टेबलस्पून.  जिरं १ टीस्पून.  चवीसाठी मीठ.  भाजलेले शेंगदाणे १/४ वाटी.  लाल मिरच्या १/४ वाटी.  लहसून १/४ वाटी.  हिंग १/२ टीस्पून.  कुळीथ पीठ २ वाटी.  गव्हाचं पीठ १/२ वाटी.  पूर्वतयारी   प्रथम मिक्सरमध्ये लाल मिरच्या, लहसून, मीठ टाकून बारीक करून घेणे.  नंतर भाजलेले शेंगदाणे आणि थोडस पाणी टाकून पुन्हा बारीक करून घेणे.  वाटण तयार झाल्यानंतर शेंगुळ्यासाठी पीठ भिजवून घ्यावे.  कुळीथ पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करावे. आता मिक्सरमध्ये तयार करून घेतलेले वाटण  या पिठात मिक्स करून घ्यावे. 

बटाट्याची पातळ रस्सा भाजी | Maharashtrian Potato Curry | Batata Recipe in Marathi | CookWithDeepali

                          बटाट्याची  पातळ रस्सा भाजी                                  Maharashtrian Potato Curry बटाट्याची भाजी / Potato Recipe सर्वाना खूप आवडते . बटाट्याची भाजी / Potato  Recipe बनवायच्या अनेक पद्धती आहे जसे की Potato Chutney , Crispy Potato fry , Chillli Potato , Btatavada  , Aloo Paratha  , Potato Chips, Aloo Bhujiya , Eggpalnt Potato Curry  इत्यादी.  मी इथे महाराष्ट्रीयन गावाकडे झटपट बटाट्याची रस्सा भाजी / Potato  Curry कशी बनवतात हे सांगितले आहे. बटाटे , कांदा आणि शेंगदाण्याचा कूट वापरून बटाट्याची रस्सा भाजी खूपच चविष्ट बनते.  गावाकडे चुल्हीवर हि भाजी बनविण्यासाठी भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यावर शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले जातात . नंतर काळ्या बुडाच्या कढईमध्ये खाली सांगितल्याप्रमाणे फोडणी देऊन बटाट्याची भाजी कमी जाळावर झाकण ठेऊन शिजत ठेवली जाते. भाजलेले शेंगदाणे पाट्यावर वाटून घेतात. शेंगदाणे वाटून होईपर्यंत भाजी मस्त शिजली जाते. भाजी शिजल्यानंतर त्यात वाटलेले शेंगदाणे टाकून चमच्याने भाजी मिक्स करून १ ते २ मिनिटानंतर चूल विझवली जाते.  साहित्य