Skip to main content

Pohyacha Chivda in Marathi | Maharashtrian Recipe

          Poha Chivda Recipe In Marathi Video  


पोहे आणि चिवडा ( Chivda) हे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहे. दिवाळी आली कि तयारी सुरु होते ती दिवाळीच्या फराळाची. दिवाळी च्या फराळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात बनविला जाणारा खाद्यपदार्थ म्हणजे Patal Pohyacha Chivda.


Pohyacha Chivda 


  1. Patal Poha Chivda. 
  2. Bhajke Poha Chivda. 
  3. Dagdi Poha Chivda, etc. 

आजचा माझा लेख आहे पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा?
खूपच कमी वेळेत, कमी खर्चात, आणि कमीत कमी साहित्य वापरून हा पातळ Pohyacha Chivda आपण घरच्या घरी बनवू शकतो. 


साहित्य 


  1. शेंगदाणे १/२ वाटी. 
  2. खोबऱ्याच्या पातळ चकत्या १/२ वाटी. 
  3. मोहरी १ टीस्पून. 
  4. जिरं १ टीस्पून.
  5. हिंग १ टीस्पून. 
  6. हळद १ टीस्पून. 
  7. मीठ चवीप्रमाणे. 
  8. किशमिश . 
  9. पिठी साखर २ टीस्पून. 
  10. कडीपत्ता. 
  11. कोथिंबीर. 
  12. हिरवी मिरची. 
  13. तेल. 
  14. पातळ कागदी पोहे १ बाउल. 


कृती 


सर्वप्रथम पोहे चाळणीने चाळून साफ करून घ्यावे.

आता हे साफ करून घेतलेले पोहे कढई मध्ये मध्यम आचेवर साधारण ५ ते १० मिनिटे भाजून घ्यावे. 

सर्व पोहे एकसारखे भाजून घेण्यासाठी चमच्याने सतत वरखाली करावे. 

पोह्यांना हलकासा लालसर रंग आला कि ते एका बाउल मध्ये काढून घ्यावे.
संपूर्ण पोहे भाजून झाल्यानंतर कढई मध्ये २ टेबलस्पून तेल घ्यावे. 

तेल गरम होताच त्यामध्ये सर्वप्रथम शेंगदाणे खरपूस अशे तळुन घ्यायचे आहेत. 

शेंगदाणे खरपूस तळून झाल्यानंतर ते भाजून घेतलेल्या पोह्यांवरती टाकावे. 

शेंगदाण्यानंतर सुक्या खोबऱ्याच्या चकत्या तळून घ्यायच्या आहेत. 

कोब्र्याच्या चकत्या लालसर झाल्या कि लगेचच त्या भाजलेल्या पोह्यांवरती टाकाव्यात . 

कढई मध्ये तेल जास्त उरलं असेल तर ते काढून घ्यावे आणि किमान अंदाजे १ टेबलस्पून तेल कढई मध्ये घ्यावे. 

तेल तापल्यानानंतर त्यामध्ये आधी मोहरी, जिरं, कडीपत्ता, बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हिंग, हळद, आणि शेवटी किशमिश घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. हि तयार करून घेतलेली फोडणी भाजून घेतलेल्या पोह्यांवरती टाकावी किंवा या तयार केलेल्या फोडणीमध्येच भाजून घेतलेले पोहे, तळुन घेतलेले शेंगदाणे आणि खोबऱ्याच्या चकत्या घालून मंद आचेवरती व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. 

वरतून चवीसाठी मीठ घालून चमच्याने खालीवर करावे. 

पोहे कुरकुरीत झाले आहेत कि नाही यासाठी थोडेशे पोहे टेस्ट करावे. 

पोहे छान कुरकुरीत झाले म्हणजे आपला Pohyacha Chivda तयार आहे.
गॅस बंद करून आपल्या आवडीप्रमाणे वरतून चिवड्यावरती पिठी साखर घालावी आणि चिवड्यामध्ये ती व्यवस्थित मिक्स करून घ्यावी.   

अशाप्रकारे आपला झटपट कुरकुरीत आणि स्वादिष्ट असा Pohyacha Chivda तयार आहे. 

आता हा कुरकुरीत आणि स्वादिष्ट असा Pohyacha Chivda एका सर्विंग प्लेट काढून घेऊया आणि वरतून सजावटीसाठी मी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बारीक पिवळी शेव आणि तळलेली बुंदी टाकली आहे.

टिप 


पोहे कुरकुरीत होण्यासाठी ते मंद आचेवरतीच भाजून घ्यावे. 

सर्व पोहे एकसारखे भाजावे यासाठी पोहे थोडे थोडे घेऊन मगच भाजावे आणि भाजताना ते सतत चमच्याने वरखाली करावे. 

चिवडा तयार झाल्यानंतर तो कुरकुरीत राहण्यासाठी एक तासानंतरचं  हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करावा.  

 तुम्हाला हि रेसिपी  रेसिपी आवडली असेल तर  तुमच्या सोशल  मीडिया  प्लॅटफॉर्मवर  खाली दिलेली लिंक नक्की शेअर  करा. 
https://www.chivda.org/2019/01/pohyacha-chivda-recipe-in-marathi.html

Comments

Popular posts from this blog

खुरसनी चटणी | Karale Chutney Recipe In Marathi | Niger Seeds Benefits

        Karale Chutney Recipe In Marathi  Karale याला Khursani असेही म्हणतात. हिंदीमध्ये Ramtil तर इंग्रजीमध्ये Niger Seed असे म्हटले जाते. Garlic Cloves, Dry Red Chillies, Khursani / Karale, Roasted Peanuts, चवीसाठी मीठ मिक्स करून Khursani  / Karale ची चटणी बनविली जाते.    कारळे / खुरसनी चे फायदे / Niger Seeds Benefits  १) जखमेवरील खाजेसाठी खुरसनीची पेस्ट उपयोगी आहे.  २) खोकला येत असल्यास खुरसनीची अंकुरे आणि लहसून मधात मिक्स करून घ्यावे.  ३) खुर्सानीचें तेल : वजन वाढविण्यासाठी, जखम लवकर बरी होण्यासाठी, त्वचेवरील सुरकुत्या घालविण्यासाठी, निद्रानाश दूर करण्यासाठी, शांत झोपेसाठी, त्वचेच्या संरक्षणासाठी, दुखण्यावरील सूज कमी करून आराम मिळविण्यासाठी, हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी खुरसनी तेल खूपच उपयुक्त आहे.  Khurasanichi Chutney बनविण्यासाठी लागणारे  साहित्य  १ वाटी कारळे / खुरसनी.  १/२ वाटी भाजलेले शेंगदाणे.  १५-२० लहसून पाकळ्या.  १...

बटाट्याची पातळ रस्सा भाजी | Maharashtrian Potato Curry | Batata Recipe in Marathi | CookWithDeepali

                          बटाट्याची  पातळ रस्सा भाजी                                  Maharashtrian Potato Curry बटाट्याची भाजी / Potato Recipe सर्वाना खूप आवडते . बटाट्याची भाजी / Potato  Recipe बनवायच्या अनेक पद्धती आहे जसे की Potato Chutney , Crispy Potato fry , Chillli Potato , Btatavada  , Aloo Paratha  , Potato Chips, Aloo Bhujiya , Eggpalnt Potato Curry  इत्यादी.  मी इथे महाराष्ट्रीयन गावाकडे झटपट बटाट्याची रस्सा भाजी / Potato  Curry कशी बनवतात हे सांगितले आहे. बटाटे , कांदा आणि शेंगदाण्याचा कूट वापरून बटाट्याची रस्सा भाजी खूपच चविष्ट बनते.  गावाकडे चुल्हीवर हि भाजी बनविण्यासाठी भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यावर शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले जातात . नंतर काळ्या बुडाच्या कढईमध्ये खाली सांगितल्याप्रमाणे फोडणी देऊन बटाट्याची भाजी कमी जाळावर झाकण ठेऊन शिजत ठेवली जाते. भाजलेल...

Shengule Recipe In Marathi

              Kulith Shengule Recipe In Marathi कुळीथ पिठाचे Shengule / Kulith Shengole  महाराष्ट्रातील अतिशय जुनी पारंपारिक रेसिपी आहे.  Shengule / Kulith Shengole  खाण्यासाठी खूपच चविष्ट आणि पौष्टिक असतात.  थंडीमध्ये तर आवर्जून Shengule / Kulith Shengole  बनविले जातात.  Kulith Benefits : प्रोटीन, व्हिटॅमिन, लोह यांच प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते.  कुळीथ पिठाचे सूप लहान मुलांसाठी खूपच पौष्टिक असते.  साहित्य   फोडणीसाठी तेल २ टेबलस्पून.  जिरं १ टीस्पून.  चवीसाठी मीठ.  भाजलेले शेंगदाणे १/४ वाटी.  लाल मिरच्या १/४ वाटी.  लहसून १/४ वाटी.  हिंग १/२ टीस्पून.  कुळीथ पीठ २ वाटी.  गव्हाचं पीठ १/२ वाटी.  पूर्वतयारी   प्रथम मिक्सरमध्ये लाल मिरच्या, लहसून, मीठ टाकून बारीक करून घेणे.  नंतर भाजलेले शेंगदाणे आणि थोडस पाणी टाकून पुन्हा बारीक करून घेणे.  वाटण तयार झाल्यानंतर श...