झटपट बनवा Bread Omelette Sandwich
बऱ्याच ठिकाणी सकाळच्या नाश्त्यामध्ये Omelette, Plain Omelette, Masala Omelette, Bread Egg Omelette Sandwich, इत्यादी Egg Breakfast Recipes बनविल्या जातात. अंड्याच्या या रेसिपी आमच्या घरी अतिशय आवडीने खाल्या जातात. अंड्याची अशीच एक रेसिपी आहे जी अगदी झटपट नाश्त्याला बनविली जाते तीच नाव आहे Bread Omelette Sandwich.
साहित्य
- बारीक चिरलेला १ कांदा.
- बारीक कापलेला १ टोमॅटो.
- बारीक कापलेली कोथिंबीर.
- बारीक कापलेल्या ४-५ हिरव्या मिरच्या.
- लाल तिखट.
- चाट मसाला (Optional).
- चवीसाठी मीठ.
- २ ब्रेड ऑम्लेट बनविण्यासाठी ४ अंडी.
- कडा काढून घेतलेले ४ ब्रेड.
- तेल/बटर/तूप.
कृती
प्रथम एका मिक्सिन्ग बाउल मध्ये आवडीप्रमाणे बारीक कापलेला कांदा , टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चवीसाठी मीठ, लालतिखट आणि चाट मसाला घेऊन मिक्स करून घ्यावे.
आता या मिश्रणात १ Bread Omelette बनविण्यासाठी २ अंडी २ ते ३ मिनिटे फेटून घ्यावे.
तवा गरम होण्यासाठी ठेवावा. आणि गरम झाल्यावर त्यावर १ टीस्पून तेल/बटर/तूप पसरवून द्यावे.
फेटून घेतलेले मिश्रण तव्यावर ओतून स्प्रेड करावे.
त्यावरती ब्रेडच्या दोन्ही साईड भिजवून घ्याव्या. दुसऱ्या ब्रेडला पण त्याचप्रमाणे भिजवून घ्यावे.
गॅस मंद आचेवरती असायला हवा.
ऑम्लेट च्या कडा शिजल्यावर चमच्याने त्या ब्रेडवर फोल्ड करून घ्याव्यात.
चमच्याने पलटवून Bread Omelette ची दुसरी बाजू पण फ्राय करून घ्यावी.
दुसरी बाजू फ्राय झाल्यानंतर चमच्याने पुन्हा पलटवून १ ब्रेड दुसऱ्या ब्रेड वर फोल्ड करून घ्यावा.
आता हे तयार झालेले Bread Omelette एका सर्विंग प्लेट मध्ये काढून डेकोरेट करून घ्यावे.
ब्रेड ऑम्लेट सँडविच Breakfast Recipe Video
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2019/02/bread-omelette-sandwich-in-marathi.html
Comments
Post a Comment