Olya Naralachi Chatni in Marathi
या चटणीला Idli chutney, Dosa Chutney, Appam Chutney, Medu Vada Chutney, असेही म्हणतात.
Khobryachi Chatni ( Coconut Chutney )
हि दक्षिण भारतामधील (केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पॉंडिचेरी, तेलंगणा, कर्नाटक )अतिशय कॉमन अशी चटणी डिश आहे.
हि Idli, Dosa, Appam, Medu Vada इत्यादी दक्षिण भारतीय डिशसोबत सर्व्ह केली जाते.
हि नारळ, हिरवी मिरची, लहसून, आलं, कडीपत्ता, कोथिंबीर, मोहरी चा वापर करून बनविली जाते.
साहित्य
- खोबऱ्याचे काप १ वाटी.
- भाजून घेतलेले शेंगदाणे १/२ वाटी.
- कोथिंबीर.
- हिरवी मिरची.
- मीठ चवीसाठी.
- लहसून.
- पाणी.
- तेल फोडणीसाठी.
- मोहरी १/२ टीस्पून.
- जिरं १/२ टीस्पून.
- कडीपत्ता.
- हिंग १/२ टीस्पून.
कृती
वाटण
खोबऱ्याचे काप, भाजून घेतलेले शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची, चवीसाठी मीठ, लहसून, आणि १/२ ग्लास पाणी घालून हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
आता हे बारीक करून घेतलेले वाटण एका बाऊलमध्ये काढून घ्यावे.
तडका
आता तडका देण्यासाठी तेल गॅसवरती कडकडित गरम करून घ्यावे.
तेल कडकडित गरम झाल्यावरती गॅस बंद करून त्यामध्ये मोहरी, जिरं, कडीपत्ता आणि शेवटी हिंग यांची फोडणी देऊन ती तयार करून घेतलेल्या वाटणावरती टाकावी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
त्याचबरोबर कोथंबीरीने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सजावट करून तयार झालेली Coconut Chutney/ Khobryachi Chatni तुम्ही Idli, Dosa, Medu Vada, Appam यांसोबत सर्व्ह करू शकता.
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2019/02/coconut-chutney-recipe.html
https://www.chivda.org/2019/02/coconut-chutney-recipe.html
Comments
Post a Comment