Maswadi Recipe In Marathi Video
Maswadi Recipe In Marathi Video
Maswadi पदार्थाविषयाची माहिती :
मासवडी डिश हा एकअतिशय मसालेदार, पारंपारिकआणि महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय पदार्थआहे. बहुतेकदा जेव्हा शाकाहारीअतिथी घरी येतात तेव्हा हि Maswadi Dish बनविली जाते कारण हि डिश पूर्णपणे शाकाहारी आहे .
साहित्य
सारण
- लवंग ४.
- वेलची २.
- काळी मिरी ४.
- भाजून घेतलेली खसखस १.५ टेबलस्पून.
- भाजून घेतलेले धने १.५ टेबलस्पून .
- भाजून घेतलेले तीळ अर्धी वाटी .
- किसून भाजून घेतलेले सुके खोबरे अर्धी वाटी .
- तळुन घेतलेला कांदा १( मध्यम ).
- चवीप्रमाणे मीठ .
आवरण
- हिंग १ टीस्पून.
- हिरवी मिर्ची आणि लहसून यांचा ठेचा /लाल तिखट १ टेबलस्पून.
- चाळुन घेतलेले बेसन पीठ १ वाटी .
- पाणी.
- मीठ.
- तेल.
मासवडी रस्सा
- कोथिंबिर.
- तेजपान.
- हिरवी मिर्ची आणि लहसून यांचा ठेचा /लाल तिखट १ टेबलस्पून.
- जिरे १ टीस्पून.
- लाल तिखट २टीस्पून.
- गरम मसाला २ टीस्पून.
- भाजून घेतलेले खोबऱ्याचे काप अर्धी वाटी.
- भाजलेला कांदा अर्धी वाटी.
- बाजून घेतलेले बेसन पीठ अर्धी वाटी.
- तेल.
- मीठ.
कृती
सारण (मासवाडी मध्ये भरण्यासाठी लागणारे सारण )
सर्वप्रथम वेलची, काळी मिरी, लवंग, खसखस, धने, तीळ एकत्र मिक्सर मध्ये वाटून घ्यावे . हे मिश्रण व्यवस्थित बारीक झाल्यानंतरच त्यामध्ये तळून घेतलेला मध्यम आकाराचा १ कांदा, किसलेले सुके खोबरे आणि मीठ घेऊन पुन्हा वाटून घ्यावे .
आवरण (खिशी )
कढई मध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घ्यावे .
त्यात हिंग, १ टेबलस्पून ठेचा/लाल तिखट तळून घ्या .
२ वाटी पाणी टाका.
उकळी आल्यानंतर त्यात चाळुन घेतलेले बेसन पीठ टाका आणि मिक्स करून घ्या.
२ ते ३ मिनिटं झाकण ठेऊन खिशी शिजवून घ्या.
मासवडी
एक सुती कपडा ओला करून पोळपाटावर पसरवून घ्या.
कपड्याला तेल पाणी लावावे म्हणजे खिशी कपड्याला चिकटणार नाही.
गरम गरम खिशी (२ मोठे चमचे ) कपड्यावर गोल आकारामध्ये पसरवून घ्या .
यावरती जास्तीतजास्त सारण भरून पसरवून घ्यावे.
आता कपड्याचा अर्धा भाग हातावर घेऊन हळुवारपणे घडी करा आणि त्याचबरोबर घडी करत असताना हलक्याशा हाताने सारण आतून दाबून घ्या.
आता याला माशाचा आकार द्या आणि सारण बाहेर पडायला नको यासाठी कडा व्यवस्थित दाबून घ्या .
आता कपडा बाजूला करून तयार करून घेतलेला माशाचा आकार एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्याच्या वड्या करून घ्या .
मासवडी रस्सा
मिक्सरच्या भांड्यात जिरे, २ टीस्पून लालतिखट, २ टीस्पून गरम मसाला, खोबर, कांदा, बेसन, १ टेबलस्पून ठेचा आणि चवीप्रमाणे मीठ टाकून वाटण तयार करून घ्या.
आता हे वाटण, तेजपान, २ टीस्पून लाल तिखट कढई मध्ये छान तळून घ्या.
त्याचबरोबर तुम्ही उरलेलं सारण पण यामध्ये घेऊ शकता .
मसाला परतल्यानंतर अंदाजे २ ग्लास पाणी घाला आणि १ ते २ उकळी आल्यानंतर गॅस बंद करने.
अशाप्रकारे तयार झालेली Maswadi आणि Maswadi Rassa एका प्लेटमध्ये घेऊन या डिशला आपण वरील यु ट्यूब विडिओ मध्ये दाखविल्याप्रमाणे सजावट करू शकतो.
अशाप्रकारे तयार झालेली Maswadi आणि Maswadi Rassa एका प्लेटमध्ये घेऊन या डिशला आपण वरील यु ट्यूब विडिओ मध्ये दाखविल्याप्रमाणे सजावट करू शकतो.
विशेष टिप
१. बेसन चाळून घेतल्यास गुठळया होत नाही आणि त्याचबरोबर बेसन पीठ उकळी मध्ये थोडं थोडं करून टाकत असताना सतत चमच्याने मिक्स करत रहा म्हणजे मिश्रण छान असे एकजीव होईल.
१. बेसन चाळून घेतल्यास गुठळया होत नाही आणि त्याचबरोबर बेसन पीठ उकळी मध्ये थोडं थोडं करून टाकत असताना सतत चमच्याने मिक्स करत रहा म्हणजे मिश्रण छान असे एकजीव होईल.
२. वेलची, काळी मिरी, लवंग, खसखस, धने, तीळ सर्वप्रथम बारीक करून घेतल्यानंतरच उरलेले पदार्थ या मिश्रणामध्ये बारीक करावे.
३. खिशी हि गरम असतानाच मासवडीचा आकार तयार करून घ्यायचा आणि थंड झाल्यावरचं तिच्या वड्या करून घाव्यात.

तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
३. खिशी हि गरम असतानाच मासवडीचा आकार तयार करून घ्यायचा आणि थंड झाल्यावरचं तिच्या वड्या करून घाव्यात.

https://www.chivda.org/2019/02/maswadi.html
Comments
Post a Comment