Prasadacha Sheera ( Rava )
Prasadacha Sheera
ज्याप्रमाणे हिंदू धर्मातील पूजा पंचामृताशिवाय पूर्ण होत नाही अगदी त्याचप्रमाणे सत्यनारायणाची पूजा हि प्रसादाच्या शिऱ्याशिवाय अपूर्ण आहे. प्रसादाचा शिरा हा रव्यापासून ( Rava ) बनविला जातो. प्रसादाच्या शिऱ्यामध्ये सर्व पदार्थ हे प्रत्येकी सव्वा किलो या प्रमाणात घेतले जातात परंतु या लेखात मी प्रत्येकी १ वाटी हे प्रमाण घेणार आहे. Rava , साजूक तूप, साखर, पाणी, दूध यापासून सत्यनारायण पूजेमधील हा Prasadacha Sheera बनविला जातो.
साहित्य
रवा( Rava ) १ वाटी.
केसर घालून घेतलेले दूध १ वाटी.
साखर १ वाटी.
बारीक कापलेली पिकलेली केळी १ वाटी (आवडीप्रमाणे ).
पाणी १ वाटी.
साजूक तूप १ वाटी.
वेलचीपूड १/२ टीस्पून.
ड्रायफ्रूट्स.
कृती
प्रथम कढई मध्ये तूप गरम होण्यासाठी ठेवावं.
तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये केळीचे काप टाकून मध्यम गॅसवरती २ ते ३ मिनिटे तळून घ्यावे.
केळी छान सोनेरी झाल्यावरती त्यामध्ये Rava परतवून घ्यायचा आहे.
Rava हलकासा लालसर होईपर्यंत भाजून घेण्यासाठी मंद आचेवरती साधारण १५ ते २० मिनिटे लागतील.
Rava लालसर झाल्यानंतर त्यात उकळून घेतलेले दूध आणि गरम पाणी टाकावे आणि चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.
३ त ४ मिनिटे कढई वरती झाकण ठेवावे. ३ मिनिटं झाल्यानंतर झाकण बाजूला करून चमच्याने Sheera खाली वर करावा आणि आता त्यामध्ये साखर टाकावी. साखर Sheera मध्ये मिक्स करून घ्यावी. साखरेच पाणी झाले कि ड्रायफ्रूट्स टाका व चमच्याने मिक्स करून घ्यावे. शेवटी वेलचीपूड टाकावी आणि चमच्याने मिक्स करावी.
आता गॅस बंद करून ३ ते ४ मिनिटे कढई वरती झाकण ठेवावे.
तयार झालेला Prasadacha Sheera एका वाटीमध्ये काढून घ्यावा आणि त्यावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सजावट करावी.
आता गॅस बंद करून ३ ते ४ मिनिटे कढई वरती झाकण ठेवावे.
तयार झालेला Prasadacha Sheera एका वाटीमध्ये काढून घ्यावा आणि त्यावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सजावट करावी.
प्रसादाचा शिरा Marathi Recipe Video
टीप
Sheera बनविताना दूध आणि पाणी हे गरम केलेले असावे त्यामुळे Sheera मध्ये गाठी राहत नाही आणि Rava पण मऊ शिजण्यासाठी मदत होते.
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा. https://www.chivda.org/2019/02/shengule-recipe-in-marathi.html
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा. https://www.chivda.org/2019/02/shengule-recipe-in-marathi.html
Comments
Post a Comment