Kulith Shengule Recipe In Marathi
कुळीथ पिठाचे Shengule / Kulith Shengole महाराष्ट्रातील अतिशय जुनी पारंपारिक रेसिपी आहे.
Shengule / Kulith Shengole खाण्यासाठी खूपच चविष्ट आणि पौष्टिक असतात.
थंडीमध्ये तर आवर्जून Shengule / Kulith Shengole बनविले जातात.
Kulith Benefits :
प्रोटीन, व्हिटॅमिन, लोह यांच प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते.
कुळीथ पिठाचे सूप लहान मुलांसाठी खूपच पौष्टिक असते.
साहित्य
- फोडणीसाठी तेल २ टेबलस्पून.
- जिरं १ टीस्पून.
- चवीसाठी मीठ.
- भाजलेले शेंगदाणे १/४ वाटी.
- लाल मिरच्या १/४ वाटी.
- लहसून १/४ वाटी.
- हिंग १/२ टीस्पून.
- कुळीथ पीठ २ वाटी.
- गव्हाचं पीठ १/२ वाटी.
पूर्वतयारी
प्रथम मिक्सरमध्ये लाल मिरच्या, लहसून, मीठ टाकून बारीक करून घेणे.
नंतर भाजलेले शेंगदाणे आणि थोडस पाणी टाकून पुन्हा बारीक करून घेणे.
वाटण तयार झाल्यानंतर शेंगुळ्यासाठी पीठ भिजवून घ्यावे.
कुळीथ पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करावे. आता मिक्सरमध्ये तयार करून घेतलेले वाटण या पिठात मिक्स करून घ्यावे.
थोडं थोडं पाणी मिक्स करून पीठ मळुन घ्यावे.
Shengule वळता येतील इतकं घट्ट पीठ भिजवून घ्यावे. परातीला खाली तेल लावून पीठ पुन्हा तेलात मळून घ्यावे.
या मळलेल्या पिठातील लहानसा गोळा १ वाटी पाण्यात भिजत ठेवावा.
आता पोळपाट घेऊन त्यावर Shengule वळून घ्यावे (खाली व्हिडिओ मध्ये दाखविल्याप्रमाणे).
सर्व पिठाचे शेंगुळे वळून घ्यायचे आहेत.
कृती
Shengule वळून झाल्यानंतर गॅस चालू करून त्यावर पातेले ठेवावे. त्यात फोडणीसाठी तेल टाकावे.
तेल तापल्यानंतर त्यात हिंग आणि जिऱ्याची फोडणी द्यावी आणि साधारण अडीच तांबे पाणी टाकावे.
पाण्याला उकळी येण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवा आणि गॅस मोठा करा.
उकळी आल्यानंतर गॅस कमी करून त्यात वळलेले Shengule एक एक करून पातेल्यात सोडून द्यावे.
साधारण १ तास Shengule शिजवून घ्यावे आणि मधून मधून चमच्याने मिक्स करून द्यावे त्यामुळे Shengule खाली लागणार नाही.
१ तासानंतर Shengule दाबून पाहावे. आता शिजलेले Shengule एका सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यावे.
टीप
Shengule च्या पिठामध्ये गव्हाचं पीठ समप्रमाणात घेतल्यास Shengule
लवकर शिजतात(लहान मुलांसाठी).
गव्हाचं पीठ कमी घेतल्यास Shengule शिजण्यासाठी साधारण १ तास लागतो.
लहसून जास्त घेतल्यास Shengule छान लागतात.
वाटण करताना लाल मिरच्या मीठ टाकून वाटल्यास व्यवस्थित बारीक होतात.
शेंगुळे / कुळदाची जलेबी Marathi Recipe Video
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2019/02/shengule-recipe-in-marathi.html
https://www.chivda.org/2019/02/shengule-recipe-in-marathi.html
Thanks for sharing valuable information, this is the best article which I have ever read, Here I’m sharing best “Homemade food online delivery” details, just go through it.
ReplyDeleteHOMEMADE FOOD ONLINE DELIVERY
HOMEMADE FOOD DELIVERY
👌👌thnx for this
ReplyDelete