Bombil Fry Recipe In Marathi
Bombil Fry Recipe मध्ये खुरसानीची पावडर टाकल्यामुळे बोंबील खूप चविष्ट लागतात. Bombil Fry बनविताना सुके बोंबील घेतलेले आहे. खुरसानीची पावडर, कांदा, लहसून, चवीसाठी मीठ, हिंग, हळद, लालतिखट आणि कोथिंबीर घालून Bombil Fry Recipe बनवलेली आहे.
साहित्य
- बोंबील १ वाटी.
- १ छोटा कांदा उभा कापलेला (Optional).
- २ टेबलस्पून खुरसानीची पावडर.
- कोथिंबीर.
- १ टीस्पून हिंग.
- १ टीस्पून हळद.
- २ टीस्पून मीठ.
- १ टेबलस्पून ठेचून घेतलेला लहसून.
- २ मोठे चमचे तेल.
- २ टीस्पून लालतिखट.
- कडीपत्ता.
पूर्वतयारी
बोंबील धुण्यासाठी पाणी गरम करावे. पाण्यात हात घालता येईल इतकं पाणी गरम असावे.
नंतर ३ वेळा पाण्याने बोंबील स्वच्छ करावे.
शेवटी एक एक बोंबील पाण्यातून बाहेर काढावे.
खुरसनीची पावडर
प्रथम पॅनवर खुरासनी मंद आचेवरती भाजून घ्यावी.
खुरसानी तडतडली कि गॅस बंद करून थंड झाल्यावर ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी.
कृती
प्रथम पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवावे.
तेल गरम होताच त्यात हिंग, हळद तळून घ्यावे.
त्यानंतर ठेचलेला लहसून आणि कडीपत्ता छान तळून घ्यावा.
हे सर्व तळून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा परतवून घ्यावा.
कांदा परतवून झाल्यावर कोथिंबीर, लालतिखट, आणि बोंबील टाकून २ ते ३ मिनिटे व्यवस्थित परतवून घ्यावे.
आता वरतून चवीसाठी मीठ आणि खुरसनीची पावडर टाकून सर्व मिश्रण चमच्याने मिक्स करावे.
बोंबील शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी टाकावे.
बोंबीलला उकळी आल्यानंतर गॅस कमी करून वरतून झाकण ठेऊन १० मिनिटे बोंबील शिजवून घ्यावे. मधून मधून झाकण बाजूला करून बोंबील चमच्याने मिक्स करून द्यावे, त्यामुळे बोंबील एकसारखे शिजतील.
१० मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करून बोंबील चमच्याने पुन्हा व्यवस्थित मिक्स करून सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यावे.

टीप
बोंबील धुताना पाणी जास्त कडक नसावे.
खुरसानीचा वापर योग्य त्या प्रमाणातच करावा. जास्त प्रमाणात खुरसानी टाकू नये.
Bombil Fry Recipe In Marathi You Video
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2019/04/bombil-fry-recipe-in-marathi-suke-bombil.html
Comments
Post a Comment