Bharli Vangi Recipe In Marathi
साहित्य
- कापलेला १ कांदा .
- कापलेल्या ३ ते ४ हिरव्या मिरच्या.
- लहसनाच्या ९ ते १० पाकळ्या.
- कडीपत्ता.
- कोथिंबीर.
- ३ मोठे चमचे तेल.
- २ चमचे गरम मसाला.
- २ चमचे लाल तिखट.
- भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट १ वाटी.
- हिंग १/२ छोटा चमच्या.
- हळद १ छोटा चमच्या.
- जिरे १ छोटा चमच्या .
- मीठ ३ छोटे चमचे.
- आणि ६ ते ७ वांगी.
पूर्वतयारी
वाटण
प्रथम मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, कांदा , लहसून, आणि हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घ्यावे.
सारण
एका ताटामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, मिक्सरमध्ये तयार केलेले अर्धे वाटण, दीड छोटा चमच्या मीठ, १ चमच्या लालतिखट, १ चमच्या गरम मसाला घेऊन हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.
कृती
Vangi सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यावी.
त्यानंतर विळीने वांग्याचे देठाचे वरचे टोक, आणि काटे काढून वांग्याचे मधोमध अर्ध्याच्या वर चार काप करावेत.
Vangi कापल्यानंतर लाल पडू नये म्हणून लगेचच त्यामध्ये तयार केलेले सारण भरून घ्यावे.
आता कढई मध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवावे.
तेल गरम होताच त्यामध्ये हिंग, हळद, जिरं, कडीपत्ता छान तळून घ्यावा.
नंतर मिक्सरच्या भांड्यातील उरलेले अर्धे वाटण तेलात व्यवस्थित परतवून घ्यावे. आणि मिक्सरच्या भांड्यात थोडस पाणी टाकून हिसळून नंतर ते भाजी शिजण्यासाठी गरम करून टाकावे.
आता वरतून १ चमच्या लालतिखट, आणि गरम मसाला टाकावा आणि चमच्याने छान मिक्स करावा.
यानंतर वांग्यामध्ये भरण्यासाठी घेतलेले सारण उरलं असेल तर ते पण कडईमध्ये टाकून चमच्याने मिक्स करून घ्यावे.
सारण मिक्स केल्यानंतर सारण भरून घेतलेली Vangi यात मिक्स करावीत.
हे सर्व झाल्यानंतर वांगी शिजण्यासाठी २ ते अडीच ग्लास पाणी टाकावे.
दीड छोटा चमचा मीठ टाकून चमच्याने मिक्स करावे.
उकळी आल्यानंतर भाजीवर झाकण ठेऊन २० मिनिटे भाजी शिजवून घ्यावी .
१० मिनिटे झाल्यानंतर झाकण बाजूला करून चमच्याने वांगी खाली वर करावीत.
२० मिनिट झाल्यानंतर झाकण बाजूला करावे. चेक करून पाहावे वांग्याचे देठ आणि फोडी शिजल्या आहेत कि नाही.
Vangi शिजल्यानंतर गॅस बंद करून Bharli Vangi / Baingan Masala एका सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यावा .
टीप
वांगी फ्रिज मध्ये ठेवलेली असल्यास ती शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे भाजी बनविण्याअगोदर वांगी एक तास पहिले बाहेर काढून ठेवावीत.
वांग्याचे देठ शिजल्यानंतरच वांगी शिजली आहेत असे समजावे.
वांगी शिजत असताना मधून मधून वांगी खाली वर करावीत त्यामुळे ती एकसारखे शिजतील.
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2019/05/bharli-vangi-vangyachi-bhaji-bharwa.html
Comments
Post a Comment