Besan Gatte Ki sabzi Recipe in marathi
गट्टे की सब्जी हा राजस्थानमधील अतिशय प्रसिद्ध असा खाद्यपदार्थ आहे. बेसनाचे पीठ / Gram Flour वापरून गट्टे बनविले जातात. त्यात दही, साजूक तूप, तेल, लालतिखट, हळद, धनापावडर, चवीप्रमाणे मीठ टाकून बेसनाचे पीठ मळून घेतले जाते आणि शेंगुळे प्रमाणे त्यांना पोळपाटावर वळून पाण्यामध्ये उकळून त्याला छोट्या आकारात कापून परतवलेला कांदा, लहसून, टोमॅटो, हिरव्या मिरच्या मध्ये टाकून वरतून शिजण्यासाठी गरजेप्रमाणे पाणी टाकून Gatte ki sabji बनविली जाते. घरात भाजीला काही नसेल तर गट्टे कि सब्जी हा उत्तम पर्याय आहे. Gatte ki sabzi झणझणीत असेल तर भाकरी सोबत ती खूप छान लागते. अगदी सोप्या पद्धतीने गट्टे कि सब्जी बनविली जाते. दही न टाकता पण गट्टे कि सब्जी बनविली जाते. गट्टे कि सब्जीला बेले कि सब्जी असेही म्हटले जाते.
Gatte ki sabji recipe in marathi बनविण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे
साहित्य
धनापावडर ( Coriander Powder ) ३ छोटे चमचे
हिंग ( asafoetida ) १/२ छोटा चमच्या
हळद ( turmeric powder ) २ छोटे चमचे
लाल तिखट ( red chilli powder ) ५ छोटे चमचे
जिरं ( Cumin speeds ) १ छोटा चमचा
मोहरी ( mustard seeds ) १/२ छोटा चमच्या
साजूक तूप ( clarified butter ) २ छोटे चमचे
दही (Yoghurt ) ५० ग्रॅम
तेल ( Cooking oil )
चवीसाठी मीठ ( salt )
ठेचलेला लहसून ( Crushed garlic ) १ चमच्या
कापलेल्या हिरव्या मिरच्या ( chopped green chilies ) १ चमच्या
कडीपत्ता ( curry leaves )
बारीक कापलेला कांदा ( chopped onion ) १ वाटी
बारीक कापलेला टोमॅटो ( chopped tomato ) १ वाटी
बेसन ( gram flour ) दीड वाटी
पूर्वतयारी
गट्टे बनविण्यासाठी बेसन पीठ भिजवून घ्यावे
पीठ मळून घेण्याआधी त्यात
२ छोटे चमचे लालतिखट
१ छोटा चमच्या हळद
दीड छोटा चमच्या धनापावडर
चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करून घ्यावे
त्यानंतर त्यात
२ छोटे चमचे साजूक तूप
१ वगळी तेल
आणि गरजेप्रमाणे थोडं थोडं दही टाकून बेसनाचे पीठ छान भिजवून त्याचा गोळा तयार करून घ्यावा.
पीठ व्यवस्थित मळून घ्यावे.
पीठ जास्त सैल किंवा घट्ट नाही भिजवायचे.
साजूक तूप, तेल, आणि टाकल्यामुळे गट्टे छान मऊ शिजण्यास मदत होते आणि त्याचबरोबर त्यांची चव पण उत्कृष्ट अशी लागते.
पीठ भिजवल्यानंतर त्याचे छोटे छोटे बॉल करून विडिओ मध्ये दाखविल्याप्रमाणे गट्टे पोळपाटावर वळून घ्यावे.
एकेककरून सर्व गट्टे वळून घ्यावे.
आता हे गट्टे शिजवून घेण्यासाठी एका पॅनमध्ये ३ ग्लास पाणी ओतावे. पाण्यात १/२ वगळी तेल ओतावे त्यामुळे गट्टे एकमेकांना चिकटणार नाही.
पाण्याला उकळी आल्यानंतर वळून घेतलेले सर्व गट्टे एकेककरून उकळलेल्या पाण्यात सोडावे. गट्टे पाण्यात वरती तरंगल्यानंतरच चमच्याने ते खाली वर करावे.
गट्टे तुटताना दिसले कि लगेचच गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवावे.
गट्टे थंड झाल्यावर चमच्याने ते एकेकरून प्लेटमध्ये काढून घ्यावे आणि विडिओ मध्ये दाखविल्याप्रमाणे त्याचे छोटे छोटे काप करावे.
कृती
कढई मध्ये पाव वाटी तेल टाकावे.
तेल गरम झाल्यानंतर त्यात
१/२ छोटा चमच्या हिंग
१ छोटा चमच्या हळद
७ ते ८ कडीपत्त्याची पाने
१ छोटा चमच्या जिरं
१/२ छोटा चमच्या मोहरी
ठेचलेला लहसून १ चमच्या
आणि कापलेल्या हिरव्या मिरच्या १ चमच्या टाकून तेलात छान तळुन घ्यावे.
त्यानंतर बारीक कापलेला कांदा टाकावा आणि तेलात व्यवस्थित परतवून घ्यावा.
कांदा परतल्यानंतर त्यात
दीड छोटा चमच्या धनापावडर
१ वाटी बारीक कापलेला टोमॅटो
३ छोटे चमचे लालतिखट
चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करावे.
हे सर्व पदार्थ तेलात छान परतल्यानंतर बारीक कापून घेतलेले गट्टे यात टाकावेत आणि चमच्याने खाली वर करून द्यावे.
आता गट्टे उकळवून घेतलेले पाणी यात ओतावे. आणि गट्टे शिजवून घ्यावेत.
भाजीला उकळी आल्यानंतरच त्यावर झाकण ठेवावे त्यामुळे भाजीला छान तरी येते. त्याचप्रमाणे भाजी मंद आचेवरतीच शिजवून घ्यावी.
१० ते १५ मिनिटे भाजी शिजवून घ्यावी. आणि मधून मधून झाकण बाजूला करून भाजी चमच्याने खालीवर करावी म्हणजे ती खालून लागणार नाही.
गट्टे छान मऊ शिजल्यानंतर तयार झालेली Gatte ki sabji एका सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यावी .
टिपणी
जास्त बारीक कापलेले गट्टे भाजीमध्ये खूप चविष्ट लागतात.
दही टाकल्यामुळे गट्टे मऊ होतात
तरी साठी भाजीला उकळी आल्यानंतरच शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवावे
भाजी मंद आचेवरतीच शिजवावी
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2019/10/how-to-make-gatte-ki-sabzi-besan.html
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2019/10/how-to-make-gatte-ki-sabzi-besan.html
Comments
Post a Comment