Suke Bombil Recipe In Marathi
आजचा माझा लेख आहे बोंबिलाचं कालवण कसं बनवायचं. महाराष्ट्रात बोंबिल विविध पद्धतीने बनविले जाते.
Bombil Fry.
Bombil Curry.
Bombil Chutney.
Bombil Masala.
इत्यादी अनेक पद्धती आहे Bombil Recipe बनवायच्या.
बोंबील ला इंग्लिश मध्ये Bombay Duck असे म्हणतात. महाराष्ट्रात सुकलेल्या बोंबलांना काड्या असेही म्हणतात.
Bombil चे दोन प्रकार आहे.
Ole Bombil ( ताजा मासा ) .
Suke Bombil (मीठ लावून सुकविलेला मासा ) .
साहित्य
कट करून घेतलेले सुके बोंबील १ वाटी.
कोथिंबीर( तेलामध्ये परतवून घेतलेली ).
चिरून घेतलेला १ कांदा ( तेलामध्ये परतवून घेतलेला ).
७ ते ८ लहसून पाकळ्या ( तेलामध्ये परतवून घेतलेल्या ).
३ ते ४ हिरव्या मिरच्या ( तेलामध्ये परतवून घेतलेल्या ).
आल्याचा १ तुकडा ( तेलामध्ये परतवून घेतलेला ).
कडीपत्ता.
तेल २ टेबलस्पून.
चवीसाठी मीठ.
हिंग १/२ टीस्पून.
हळद १ टीस्पून.
खुरसनी १/४ वाटी ( तव्यावर भाजून घेतलेली ).
लाल तिखट ३ टीस्पून.
चिकन मसाला १ टीस्पून ( optional ).
गरम मसाला ( optional ).
पूर्वतयारी
बोंबील धुण्यासाठी पाणी गरम करावे. पाण्यात हात घालता येईल इतकं पाणी गरम असावे.
प्रथम बोंबील 1 ते 2 मिनिटे पाण्यात भिजवून द्यावे.
नंतर ३ वेळा पाण्याने बोंबील स्वच्छ करावे.
शेवटी एक एक बोंबील पाण्यातून बाहेर काढावे.
कृती
भाजून घेतलेली खुरसनी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी.
त्यानंतर त्यामध्ये कांदा, लहसून, हिरव्या मिरच्या, आलं, कडीपत्ता, कोथिंबीर, आणि थोडसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यावे.
मसाला वाटून झाल्यानंतर गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवावी.
त्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकावे.
तेल गरम झाल्यावर त्यात हिंग आणि हळद तळून घ्यावी.
आता वाटून घेतलेला मसाला टाकून व्यवस्थित चमच्याने तेलामध्ये मिक्स करून घ्यावा.
वरतून लाल तिखट, चिकन मसाला, आणि गरम मसाला घालून मसाला छान परतवून घ्यायचा आहे.
कढई मध्ये कडेने तेल सुटलेले आहे असे दिसल्यास समजावे मसाला छान परतलेला आहे.
या मसाल्यामध्ये हे स्वच्छ केलेले बोंबील टाकावे आणि २ ते ३ मिनिटे मसाल्यामध्ये परतवून घ्यावे.
वरून चवीसाठी मीठ टाकावे. आणि चमच्याने मिक्स करून द्यावे.
मिक्सरच्या भांड्यातील मसाल्याचं उरलेलं पाणी कढईमध्ये घालावे. तुम्हाला त्याप्रमाणात पाणी घालावे. साधारण अडीच ग्लास पाणी भाजीमध्ये घालावे.
आता मोठ्या आचेवरती उकळी येऊन द्यावी. उकळी आल्यानंतर मंद आचेवरती कढईवर झाकण ठेऊन १० मिनिटे बोंबील शिजवून घ्यावे. मधून झाकण बाजूला करून बोंबील चमच्याने मिक्स करून द्यावे.
१० मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करावा आणि तयार झालेलं बोंबील च कालवण एका सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यावे. अशाप्रकारे बोंबील च कालवण तयार आहे.
टीप
मसाला बारीक करताना प्रथम खुरसनी वेगळीच बारीक करून घ्यावी त्यानंतरच बाकी पदार्थ वाटून घ्यावे. जर सर्व पदार्थ एकत्र करून बारीक केले तर खुरसनी व्यवस्थित बारीक होणार नाही.
Bombil Recipe YouTube Video
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2019/02/bombil-non-veg-recipe-in-marathi.html
https://www.chivda.org/2019/02/bombil-non-veg-recipe-in-marathi.html
खुपचं सुंदर रेसिपी 👌👌👌
ReplyDelete