Idli Recipe In Marathi
दक्षिण भारतात इडलीचा खूप मोठा प्राचीन इतिहास आहे. Idli Recipe दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आली आणि आपलीशी झाली. Idli दिसायला श्वेत रंगाची खाण्यासाठी मऊ आणि पचण्यासाठी हलकी असते. उडीद डाळ, तांदूळ भिजवून, बारीक वाटून, आंबवून Idli बनविली जाते. इडली नारळाची चटणी / Coconut Chutney किंवा सांबर यांसोबत वाढली जाते. आरोग्यासाठी इडली उत्तम आहार आहे.
त्यामध्ये पाणी घालून वेगवेगळे ७ ते ८ तास भिजत ठेवावे.
७- ८ तासानंतर भिजवलेले तांदूळ, उडीद डाळ, आणि पोहे मिक्सरमध्ये एकत्र करून रव्यासारखा वाटून घ्यावे.
आता हे सर्व बॅटर एका पातेल्यात ओतून घ्यावे.
बॅटर चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यावे. आणि आंबविण्यासाठी एक रात्र उबदार जागी ठेवावे.
दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटर फुगून वरती आलेले दिसेल. हे फेरमेन्ट झालेले बॅटर चवीसाठी मीठ टाकून फेटून घ्यावे.
इडली मोल्ड ला तेल लावून फेरमेंटेड बॅटर चमच्याने इडली मोल्ड मध्ये ओतून घ्यावे.
इडली पात्रात २ ग्लास पाणी टाकावे. आता हे इडली मोल्ड इडली पात्रात एक एक करून ठेऊन द्यावे.
आता गॅस ची फ्लेम मोठी करून इडली १० ते १५ मिनिटे वाफवून घ्यावी.
१० ते १५ मिनिटानंतर गॅस बंद करावा. आणि ५ मिनिटानंतर चमच्याला तेल लावून इडली मोल्ड मधून इडली काढून सर्विंग प्लेट मध्ये सर्व्ह करावी.
भिजवलेले तांदूळ, डाळ जास्त बारीक न करता थोडे जाडसर दळावे
इडली बॅटर जास्त पातळ नसावे.
इडली मोल्डला, आणि इडली काढताना चमच्याला तेल लावल्यास इडली पटकन निघते.
साहित्य
- तांदूळ २ ग्लास.
- उडीद डाळ १/२ ग्लास ला वरती.
- पोहे १ ग्लास.
कृती
इडलीचे पीठ ( Idli Batter )
सर्वप्रथम तांदूळ, उडीद डाळ, आणि पोहे साफ करून स्वच्छ धुवून घ्यावे.त्यामध्ये पाणी घालून वेगवेगळे ७ ते ८ तास भिजत ठेवावे.
७- ८ तासानंतर भिजवलेले तांदूळ, उडीद डाळ, आणि पोहे मिक्सरमध्ये एकत्र करून रव्यासारखा वाटून घ्यावे.
आता हे सर्व बॅटर एका पातेल्यात ओतून घ्यावे.
बॅटर चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यावे. आणि आंबविण्यासाठी एक रात्र उबदार जागी ठेवावे.
दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटर फुगून वरती आलेले दिसेल. हे फेरमेन्ट झालेले बॅटर चवीसाठी मीठ टाकून फेटून घ्यावे.
इडली ( Idli )
इडली मोल्ड ला तेल लावून फेरमेंटेड बॅटर चमच्याने इडली मोल्ड मध्ये ओतून घ्यावे.
इडली पात्रात २ ग्लास पाणी टाकावे. आता हे इडली मोल्ड इडली पात्रात एक एक करून ठेऊन द्यावे.
आता गॅस ची फ्लेम मोठी करून इडली १० ते १५ मिनिटे वाफवून घ्यावी.
१० ते १५ मिनिटानंतर गॅस बंद करावा. आणि ५ मिनिटानंतर चमच्याला तेल लावून इडली मोल्ड मधून इडली काढून सर्विंग प्लेट मध्ये सर्व्ह करावी.
टीप
पोह्यामुळे इडली सॉफ्ट, स्पॉनजि, आणि पांढरी शुभ्र दिसते.भिजवलेले तांदूळ, डाळ जास्त बारीक न करता थोडे जाडसर दळावे
इडली बॅटर जास्त पातळ नसावे.
इडली मोल्डला, आणि इडली काढताना चमच्याला तेल लावल्यास इडली पटकन निघते.
Idli Breakfast Recipe In Marathi Language Video
तुम्हाला हि रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाली दिलेली लिंक नक्की शेअर करा.
https://www.chivda.org/2019/02/idli-recipe-in-marathi.html
Comments
Post a Comment