आलू टिक्की / Potato Tikki Recipe In Marathi आलू टिक्की / Potato Tikki बनवायला खूपच साधी सोपी आणि झटपट बनविली जाणारी रेसिपी आहे. आलू टिक्की वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. चाट आलू टिक्की, उपवासाची आलू टिक्की, सुजी आलू टिक्की, पोहा आलू टिक्की, इत्यादी या टिक्की ला आपण कटलेट ,पॅटीस देखील बोलू शकतो. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी आलू टिक्की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानाच आवडते. साहित्य ४ उकडलेले बटाटे २-३ बारीक चिरलेली हिरवी मिरची चवीसाठी मीठ ५ चमचे भगरीचे पीठ साजूक तूप कृती उपवासाची आलू टिक्की साठी सर्वात प्रथम उकडलेले बटाटे किसणीने किसून घ्यावे. चारही बटाटे किसून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची ,चवीसाठी मीठ,१ चमच्या साजूक तूप आणि ५ चमचे भगरीचे पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करावे. सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याला छान मळून घ्यावे. आलू टिक्की साठी लागणारा डो तयार केल्यानंतर हाताला तूप चोळून तयार डो चे छोट्या लाडवांप्रमाणे एकसारखे पेढे तयार करून घ्या...
A Food Blog, हा एक मराठी पारंपरिक, नवीन पाककृतीचा ब्लॉग आहे. या ब्लॉगमध्ये विविध प्रकारच्या शाकाहारी, मांसाहारी, गोड, तिखट, नाश्त्याच्या पाककृती अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत.