कुरकुरीत भेंडी फ्राय Crispy Bhindi Fry Recipe in Marathi संध्याकाळी किंवा मधल्या वेळेत चहा, कॉफी, थंड पेय इत्यादी सोबत कुरकुरीत भेंडी (Crispy Bhindi ) खाण्याचा आनंद हा निराळाच. हि कुरकुरीत भेंडी खाण्यासाठी क्रिस्पी तर असतेच पण त्याचबरोबर तिची चव देखील अप्रतिम अशी लागते, सारखी खाण्याची इच्छा होत राहणार, त्यामुळे मी खास तुमच्यासाठी हि कुरकुरीत भेंडी ची (Crispy Bhindi ) खूपच मस्त चटपटीत रेसिपी शेअर करत आहे. साहित्य २५० ग्राम ताजी कोवळी भेंडी. १ छोटा चमचा तांदळाचे पीठ. १ छोटा चमचा मैदा. २ छोटे चमचे बेसनपीठ. १.५ छोटा चमचा लालतिखट. १/२ छोटा चमचा धनापावडर . १/२ छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर. १/४ छोटा चमचा हिंग. १ छोटा चमचा ओवा. थोडासा लिंबाचा रस. आणि चवीसाठी मीठ. कृती सर्वात आधी भेंडी स्वच्छ धुऊन सुकवून किंवा कपड्याने कोरडी करून घ्यावी. सुकविलेल्या भेंडीचे चाकूने किंवा विळीने वरचे टोक काढून १ भेंडीचे उभे ५ ते ६ काप करावेत. सर्व भेंडी कापल्यानंतर त्यामध्ये वरून १ छोटा...
A Food Blog, हा एक मराठी पारंपरिक, नवीन पाककृतीचा ब्लॉग आहे. या ब्लॉगमध्ये विविध प्रकारच्या शाकाहारी, मांसाहारी, गोड, तिखट, नाश्त्याच्या पाककृती अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत.